सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. ते सांगलीत बोलत होते. हातावरची माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचं काम सुरु आहे, असं संभाजी भिडे म्हणाले. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहेत, असं ते म्हणाले.
प्रजा भंपक आणि बावळट बनत आहे
कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, तो घेईल , सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायचे गांजा, मटका अफू सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद, असं संभाजी भिडे म्हणाले.
कोरोनाच्या नावाखाली देशात-राज्यात खेळखंडोबा सुरु आहे. दोन सरकार जबाबदार – जे जगायचे ते जागतील, जे मारायचे ते मारतील. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचे आदर्श ठेवून राज्य केले पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श मानून कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील, असंही संभाजी भिडेंनी नमूद केलं. कोरोना अस्तित्वात नाही. लॉकडाऊनची गरज नाही. सरकारने काही कारू नये. ज्याला-त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे, असंही ते म्हणाले.
शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला
दरम्यान, संभाजी भिडे यांनी मास्कबद्दल हे वक्तव्य पहिल्यांदाच केलंय असं नाही. त्यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला होता. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झालं होतं. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क त्यांनी काढायला लावला. यावेळी इतर कार्यकर्ते देखील विना मास्क आढळून आले होते.
मास्क न लावल्यास आता 500 रुपये दंड दरम्यान, राज्यात वीकेंड लॉकडाऊन लागू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध आहेत. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. राज्यात सध्या वीकेंड लॉकाडऊन आहे. याशिवाय 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून रात्री 8 ते सकाळी 6 पर्यंत सर्व बंद राहील. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्येदेखील काही बदल होतील. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.
Leave a Reply