ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोना ग्रामीण भागात का पसरतोय ? जालना पंचायत समितीत धक्कादाय प्रकार

March 30, 202113:27 PM 31 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने रौद्र रुप धारण केले आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन न करणे आणि मनमानी करुन बिंधास्त कसेही वागण्यामुळे कोरोने जिल्ळ्यात थैमान घातले आहे. याला शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी देखील जबाबदार असल्याचे समोर आले आहे.

जालना पंचायत समिती कार्यालयात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनच कोरोना नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील जनता आणि शहरती भागातील जनता यांचा दुवा असलेल्या पंचायत समितीत कोरोना नियमाचे ना पालन होत होते, ना अधिकारी-कर्मचारी जनजागृती करतांना दिसले. विशेष म्हणजे या कार्यालयातील कर्मचार्‍यांनीच कोरोना नियमाला आणि सरकारी आदेशाला पायदळी तुडविल्याचे दिसून आले. तोंडाला मास्क न लावता, चहापाणी, गप्पा-टप्पा मारणे तसेच कोणतेही सोशल डिस्टंस न ठेवता वावरने, सॅनीटायझरचा कुठेही वापर न करणे असे अनेक प्रकार जालना पंचायत समितीत पहायला मिळत आहेत. त्यामुळे या कार्यालयातुन ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या कार्यालयाकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

पथक आले तसेच पुढे गेले….
शहरात विनामास्क फिरणारे तसेच कोरोना नियमाचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी काही पथके जिल्हा प्रशासनाने तयार केली आहेत. परंतु ही पथके कारवाई करणे तर सोडाच साधे नियमाचे पालन न करणार्‍यांना सक्त ताकीद देखील देत नसल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात तैनात करण्यात आलेले पथक फिरत असल्याचे दिसले परंतु विनामास्क, नियमाचे कोणतेही पालन न करणार्‍या हॉटेल व्यवसायीक, इतर व्यवसायीकांवर कारवाई मात्र करीत नव्हते, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी हॉटेल सह काही आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र हे पथक केवळ बघ्याची भुमीका घेत असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कोरोना थांबणार तर नाहीच शिवाय पथकासह पुर्ण जिल्ह्यात पसरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक भुमीका घेणे अत्यंत गरजेचे आहे अशा प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *