ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फक्त महिलांनीच का त्याग करावे – अॅड. अश्विनी महेश धन्नावत

July 18, 202214:50 PM 19 0 0

जालना प्रतिनिधी : महिलांनीच फक्त त्याग का करावे, असे उद्गार अॅड. अश्विनी महेश धनावत (अध्यक्ष – स्थानिक तक्रार समिती, जालना) यांनी नुकतेच महिलांचा हक्क व अधिकार या विषयी आंतरराष्ट्रीय न्याय दिवस निमित्त आयोजित शिबिरात मार्गदर्शन करतांना केले. त्यांनी महिलांना सांगीतले की, आपल्याला घटनेने समान अधिकार व हक्क दिलेले आहेत, सन्मानाने जगावे व आवडता व्यवसाय व करियर करावे, हे सुद्धा माणवीय हक्क आहे.

त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भारती डांगरे यांनी दिलेल्या आदेशाचे उदाहरण दिले, ज्यामध्ये एका महिलेला पोलंड येथे नौकरी मिळाली होती, मात्र तिच्या पतीने तिने तिच्या लहान मुलीसह पोलंडला जाऊ नये यासाठी कौटूंबीक न्यायालयात अर्ज दाखल केले होते व कुटूंब न्यायालयाने सुद्धा पतीची बाजु घेतली की, जर मुलगी पत्नी सोबत पोलंडला गेली तर त्या लहान मुलीचा व तिच्या वडिलांच्या नात्यामध्ये दरी निर्माण होईल. या निर्णया विरुद्ध त्या महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली व त्या याचिकेचा निर्णय देतांना न्यायमुर्तीींनी असे मत व्यक्त केले की, वडील व मुलीचे नाते पेक्षा कोणतेही नाते मोठे असु शकत नाही, मात्र कोणतेही न्यायालय महिलेला तिच्या प्रगतीपासून वंचीत सुद्धा ठेवु शकत नाही व कौटूंबीक न्यायालयाच्या निर्णयाला रद्द केले. मा. न्यायालयाने असे आदेश दिले की, ती महिला मुलीसह पोलंडला जाऊ शकते, मात्र मुलीचे व वडिलाचे फोन द्वारे व व्हीडीओ कॉन्फरंसींग द्वारे भेट घडवुन द्यावी. न्यायालयाने हे सुद्धा सांगीतले की, पुरुष व महिला यांनी स्वतः बद्दल विचार करतांना मुलीबद्दल सुद्धा विचार केले पाहीजे व आपसात भांडण न करता प्रेमाने मार्ग काढला पाहिजे. या निर्णयाने महिलांनी त्यांच्या करियर पासून वंचित न राहता घराची जबाबदारी संदर्भात नियोजन करुन सदैव प्रगती करावी.

यावेळी यंग जायन्ट्स अध्यक्ष बॉबी अग्रवाल, एडवोकेट अक्षय धोंगडे ,मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ एडवोकेट अनुप धनावत एडवोकेट राहुल अग्रवाल व सदस्य उपस्थित होत्या, सदर वेबीनार ऑनलाईन पद्धतीने घेणे येत आहे. यापुर्वी सुद्धा क्लब मार्फत ज्येष्ठ नागरीक, बालहक संदर्भात मार्गदर्शन शिवीर आयोजीत करण्यात आले होते सर्वांना न्याय मिळावा हेच या शिबिराचे औचित्य आहेत. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जालना जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी चीमेंद्र यांचा मार्गदर्शन लाभला व आजादी का अमृत वर्ष असल्याने सगळ्यांना न्याय मिळावा यासाठी क्लब कटिबद्ध आहे असे मत एडवोकेट बॉबी अग्रवाल यांनी व्यक्त केले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *