जालना – जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एका घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केले आणि त्यांची चर्चा सुरू झाली. का सुरू झाली ही चर्चा ते पाहुयात.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मतदारांच्या रांगेमध्ये उभे राहुन मतदानाचा हक्क बजावत नाव नोंदणी केलेल्या अधिकाधिक पदवीधर मतदारांनी मतदानाचा अमुल्य हक्क बजावण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जालना जिल्ह्यामध्ये 74 ठिकाणी मतदान केंद्राची उभारणी केली असुन सकाळी 8-00 वाजल्यापासुन सर्वत्र शांततेमध्ये व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडत आहे. कोव्हीड 19 च्या अनुषंगाने मतदानाला येणाऱ्या प्रत्येक मतदाराची थर्मल गनद्वारे तापेची तपासणी करण्याबरोबरच ऑक्सिमीटरच्या माध्यमातुन ऑक्सिजनची पातळी तपासण्याबरोबरच सॅनिटायजरचाही उपयोग करण्यात येत आहे. मतदानासाठी रांगेत येणाऱ्या मतदारांमध्ये सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन होईल, याची खबरदारी सर्वच मतदान केंद्रावर घेण्यात येत असुन मतदारांना पसंती क्रमांक नोंदविण्यासाठी प्रत्येकाला वेगळा जांभळया शाईचे पेन देण्यात येत असुन अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.
Leave a Reply