ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बंद करणार का जातपंचायती

October 9, 202114:32 PM 74 0 0

जात पंचायतीचा भयानक त्रास सहन न झाल्याने एक पती पत्नीने विष प्राशन केल्याची घटना उस्मानाबाद येथे घडली होती.यापैकी पतीचा १४ व्या दिवशी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी संबंधित दोषीवर कारवाई करावी.या मागणीसाठी मंगळवारी दिनांक ५-१०-२०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन केले.उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील सोमनाथ छगन काळे हल्ली मुक्काम उस्मानाबाद यांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पारधी समाजातील काही पुढाऱ्यांनी जात पंचायत भरवून सोमनाथ यास २ लाख रुपयांचा दंड ठोटावला होता.त्यापैकी २० हजार रुपये दंड देखील वसूल केले .मात्र उर्वरित १लाख ८०हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे सतत तगादा लावून त्रास दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.डोक्यावर ५० किलो वजनाचा दगड ठेवण्यात येईल, उकळत्या तेलात तापविलेली कुऱ्हाड हातावर घ्यावी लागेल, आगी मोहोळाचा मध काढावा लागेल,असे सांगून जीवे मारण्याची धमकीहि देण्यात आली होती.त्यामुळे जातपंचायतीच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ व त्यांची पत्नी अनिता यांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले.यापैकी सोमनाथ यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले.या दरम्यान अनिता यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली मात्र ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचे सांगत नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आक्रोश केला.कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचे दंगल नियंत्रक पथक तत्काळ या ठिकाणी दाखल झाले, तर पोलीस निरीक्षक अंजुम शेख , पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शना खाली इतर पोलिसांचा चोक बंदोबस्त वाढविण्यात आला.दरम्यान मृतांच्या नातेवाईकातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तर तहसीलदार गणेश माळी यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करून याप्रकारे जातपंचायती द्वारे करण्यात येणारे अन्याय ,अत्याचार, जुलूम व घटना होणार नाहीत, यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी हे आंदोलन मागे घेतले.


वरील बातमी वाचून मन फार दुःखी झाले आपला देश स्वतंत्र होऊन ७३ वर्षे झालेलं आहेत आणि २६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झालेले आहे तरी सुद्धा आज अशा जिवघेण्या जातपंचायती अद्यापी चालूच आहेत. आपला भारत देश मुळातच निधर्मी राष्ट्र आहे येथे विविध जातीचे आणि विविध धर्माचे लोक रहात असतात.सर्वांसाठी येथे कायदे समान असताना सुद्धा असे काही जात समूह आहेत ते आपल्या जातीतल्या जातीत कोणी गुन्हा केला असेल तर ते जातीतल्या जातीत मिटविण्याचा प्रयत्न करतात पोलिसात अगर न्यायालयाकडे जात नाहीत आणि स्वतःच वरील प्रमाणे निर्णय घेणे किंवा त्याला अशी कठोर शिक्षा देणे योग्य नव्हे.असे करणेच मुळात आपल्या देशातील कायद्याच्या विरुद्ध आहेत आणि बेकायदेशीर आहेत.ते मन मानेल अशा कठोर शिक्षा करतात.
ही अशा जातपंचायतीच्या पहिल्याच घटना नाहीत. यापूर्वी सुद्धा अशा जातपंचायती मुळे लोक प्राणास मुकलेले आहेत.अशा जातपंचायती मनमानी करुन लोकांना जीवघेण्या शिक्षा करत असतील तर त्या पंचायतींच्यावर कठोर कारवाई करून जातपंचायतीमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक सदस्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत.त्यांना जेलची हवा घडलेच पाहिजे त्याशिवाय अशा बेकायदेशीर जातपंचायती निर्माण होऊन न्यायनिवाडा करणार नाहीत.
यातील शिक्षा अशा आहेत की २ लाख रुपयांचा दंड करणे ज्या पारधी याची सकाळची चूल पेटली तर रात्रीची चूल कशी पेटेल याची भ्रांत असते.मुळात त्यांना राहणे साठी घरे नाहीत जसे विंचवाचे बिऱ्हाड पाठीशी असते तशी त्यांची अवस्था असताना अशा पारधी समाजावर ब्रिटिश काळापासून गुन्हेगारी जमात असा शिक्का मारलेला आहे त्यामुळे काम सुद्धा त्यांना देत नाही अशा परिस्थितीत बेकाकायदेशीर मनमानी शिक्षा करणे योग्य नाही.याशिवाय ५० कि.ग्रा.चे डोक्यावर वजन ठेवणे किंवा आग मोहोळ मध काढणे जेणे करून त्या मधमाशा त्याचा चावून जीव घेतील किंवा उकळत्या तेलातील कुऱ्हाड हातावर घेणे अशा प्रकारच्या आघोरी शिक्षा बेकायदेशीर जातपंचायत करीत असेल तर ते एक प्रकारे लोकांचे जीवच घेत आहेत.मानव आयोगाने यात लक्ष घालून अशा जातपंचयाती बंद कशा करता येतील असा प्रयत्न केला पाहिजे.आपल्या प्रजासत्ताक राज्यात जर असे माणसाचे जीव घेणाऱ्या जातपंचायती असतील अशांचे समुपदेशन केले पाहिजे प्रत्येक गुन्ह्याला भारतीय दंड संहितेत तरतूद असताना अशा जातपंचायतची गरजच काय ? पोलीस अधिकाऱ्यांनी अशा जात पंचायती कोठे असतील तर त्यांचे गोंपनिय रित्या लक्ष ठेवून त्यांचेवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.
वरील प्रकणात कुटुंबकर्ता हाच जीवास मुकलेला असल्याने त्याच्या कुटूंबास शासनाकडून मदत दिली जावी.वरील प्रकारे होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्याच्या असतील तर शासनच राज्यातील सर्व ” बंद करणार का जातपंचायती ? ” असा प्रश्न मनात उभा राहतो.

लेखक
जी.एस.कुचेकर पाटील
भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा
मो.न.७५८८५६०७६१

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *