ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरक्षण व आर टी बाबत समाजाचा दूत म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार: माजी मंत्री अर्जुनराव खोतकर

December 5, 202016:15 PM 124 0 0

जालना ( प्रतिनिधी) : मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण मिळावे याकरिता सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे अहवाल सादर व्हावा तसेच बार्टी च्या धर्तीवर आरटी प्रशिक्षण संस्था निर्माण करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे समाजाचा दूत म्हणून पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आज येथे बोलतांना दिली. क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 226 व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय नागरी जयंती उत्सव समितीच्या वतीने शनिवारी ( ता. ०५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित जयंती उत्सव सोहळ्यात उद्घाटक म्हणून श्री. खोतकर बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे हे होते. या वेळी पंडीतराव भुतेकर, राजेश राऊत ,संजय इंचे, विष्णू गवळी, संजूबाबा गायकवाड, सुरेश खंडाळे ,योगिता चंद, राम सतकर, संतोष जमधडे, शेख इब्राहिम, संतोष तुप सौंदर, अनिल साळवे ,उत्सव समितीचे अध्यक्ष विक्की हिवाळे, सचिव किरण शिरसाठ,कार्याध्यक्ष संतोष निकाळजे, उपाध्यक्ष दाविद गायकवाड, कोषाध्यक्ष गणेश धायडे ,सहसचिव शिवानंद तांबे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी मंत्री अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले की, महापुरुषांनी भेदा- भेद संपवण्यात आयुष्य वेचले. तरुणांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. असे खोतकर यांनी नमूद केले. ताल शिकता येईल पण लय ही महापुरुषांमुळेच आपल्या धमन्यात वाहत असून उजळ माथ्याने समाजात दुही निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध आपले रक्त पेटले पाहिजे. अशी अपेक्षाही माजी मंत्री खोतकर यांनी यावेळी व्यक्त केली.

संजय इंचे म्हणाले, अनुसूचित जातीतील आरक्षणाची वर्गवारी व्हावी असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले असून सात न्यायाधीशांचे पीठ स्थापन केले आहे. आम्हाला इतरांचे आरक्षण नको, महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत पक्षकार म्हणून याचिका दाखल करावी .अशी मागणी इंचे यांनी केली .
विष्णू गवळी यांनी जाति-भेदातून मुक्त झालो असलो तरी आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या उपेक्षित आहोत. आमची केरसुनी धनाढ्य उद्योजकांनी हिसकावली असल्याचे त्यांनी सांगितले.
संजूबाबा गायकवाड यांनी राजसतेत सहभागी होण्यासाठी सामुहिक पणे संघटित शक्ती वाढवावी. असे आवाहन केले.
सुरेश खंडाळे यांनी महापुरुषांच्या कार्यावर समाज उभा राहावा हाच जयंती साजरी करण्याचा उद्देश असावा असे नमूद केले.
प्रास्ताविकात सचिव किराण शिरसाठ यांनी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची प्रेरणा तरुणांना मिळावी , शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या तरुण पिढी सशक्त व्हावी. यासाठी उत्सव सोहळ्याचे आयोजन केले. अशी भूमिका विषद केली.
योगिता चंद यांनी महापुरुषां प्रमाणे महिलांच्या संरक्षणासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
सूत्रसंचालन आशिष रसाळ यांनी केले तर उत्सव समितीचे अध्यक्ष विक्की हिवाळे यांनी आभार मानले. यावेळी पंचशिला भालेराव व संचाने बहारदार गीतातून प्रबोधन केले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव, महिला व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आंदोलनांची यश-अपयशे तपासावी – सचिन साठे
सामाजिक चळवळीत काम करताना भूमिका चिकित्सक असावी, व्यवस्था सातत्याने गुलाम ठेवण्यास प्रयत्नशील असते. गरीब राहील तोपर्यंत श्रीमंती टिकेल म्हणून श्रीमंत हात देणार नाहीत. तेव्हा इतिहासाचा बारकाईने अभ्यास करून आपल्या पूर्वजांसह सर्व आंदोलनांच्या यश- अपयशांचे चिंतन करावे. असे आवाहन सचिन साठे यांनी अध्यक्षीय समारोपात केले. आपल्या देशात महापुरुषांचा योग्य सन्मान होत नाही. अशी खंत व्यक्त करतानांच समाजधुरिणांनी प्रामाणिक व स्वच्छ भूमिका घेऊन काम करावे .असे त्यांनी नमूद केले. समूहातील जातिवाद घातक असून अशिक्षित व सुशिक्षित यांनी एकत्र येऊन पाय ओढण्या ऐवजी हात द्यावे तसेच आक्रमकपणे राजकीय भूमिका घेऊन राजकीय व्यवस्थेत शिरकाव करावा. आणि कागदावरचा न्याय वास्तवात आणण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत .असे आवाहनही सचिन साठे यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *