ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चांगली कामगिरी करणार्‍या नगरसेवकांसह नवीन चेहर्‍यांना संधी देणार – आ. कैलास गोरंटयाल

July 16, 202212:41 PM 14 0 0

जालना (प्रतिनिधी) : आगामी काळात होणार्‍या नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेस बरोबर आघाडी करण्यासंदर्भात पक्षीय पातळीवर चर्चा सुरू आहे.जागा वाटपा बाबत सन्मानपूर्वक तोडगा निघाला तर राष्ट्रवादीसह अन्यथा काँगेस पक्ष स्वबळावर निवडणुक लढवणार असल्याचे सूतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. कैलास गोरंटयाल यांनी आज येथे बोलताना केले. दरम्यान, पक्षाच्या ज्या नगरसेवकांनी मागील पाच वर्षात चांगली कामगिरी केली त्यांच्यासह नवीन चेहर्‍यांना उमेदवारी देताना प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
जालना जिल्ह्यात आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शुक्रवारी शहरातील मयूर हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या पूर्व आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा काग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते.तर यावेळी माजी आ.सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख,प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे,शहराध्यक्ष शेख महेमुद,जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी,राम सावंत,माजी गटनेते गणेश राऊत,राहुल देशमुख,युवा नेते अक्षय गोरंटयाल,महीला आघाडीच्या शहराध्यक्ष शितल तनपुरे,इरफान सिद्दीकी,भास्कर मगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की मागील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 28 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ अशा एकूण 37 जागांसह नगराध्यक्ष पदाची निवडणूक तब्बल 72 हजार मताधिक्य मिळवत जिंकली होती. जालना परतुर अंबड आणि भोकरदन या चारही शहरांमध्ये काँग्रेस विचारसरणीचे मतदार असून या शहरातील जनतेने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या बाजूने कौल दिलेला आहे. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीला मानणारा पक्ष असून पक्षाने आतापर्यंत सर्व जाती पातीला आणि धर्मांना सोबत घेऊन काम केले आहे.पूर्वी अन्य शहरातील लोक जालन्यात येण्यासाठी टाळाटाळ करत होते.इतकी दुरावस्था शहराची झाली होती.

मात्र त्यानंतर माजी नगराध्यक्ष पद्माताई भरतीया, पार्वताबाई रत्नपारखे आणि सौ.संगीता गोरंट्याल यांच्या कार्यकाळात शहरात विकासाची भरीव कामे केली आहे. शहरातील जनता जागृत असून विकासाची कामे करणार्‍या पुढार्‍यांना पाठबळ जनतेने नेहमीच बळ देण्याचे काम केले आहे.असे सांगून आ. गोरंटयाल म्हणाले की,नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत विजयाचे मेरीट लक्षात घेऊन तसेच ज्या नगरसेवकांनी मागील पाच वर्षात चांगली कामगिरी केली आहे अशा नगरसेवकांसह नवीन चेहर्‍यांना उमेदवारी देताना प्राधान्य देण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा काँगेस पक्षाच्या दृष्टीने जमेची बाजु असल्याचे स्पष्ट करत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील थेट शेतकरी बांधवांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्यामुळे घोडेबाजार थांबेल असा विश्‍वास आ. गोरंटयाल यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना माजी आ.सुरेशकुमार जेथलीया म्हणाले की,परतूर येथील जनतेने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या बाजूने पाठबळ दिले आहे.जनतेच्या असलेल्या विश्‍वासामुळेच परतूर नगर पालिकेवर काँगेस पक्षाचे वर्चस्व राहिले असून यावेळी देखील नगराध्यक्ष पदासह 23 पैकी किमान 15 जगांसह काँगेस पक्ष अग्रेसर राहील असा विश्‍वास जेथलिया यांनी व्यक्त केला.तत्पूर्वी कल्याण दळे,राजेंद्र राख,गणेश राऊत,राहुल देशमुख यांनी आपले विचार मांडले. यावेळी सूत्र संचलन शहराध्यक्ष शेख महेमुद यांनी तर शेवटी आभार जिल्हा उपाध्यक्ष विजय चौधरी यांनी मानले.या बैठकीस जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव,अंबड तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपूत, भोकरदन तालुकाध्यक्ष त्रिंबकराव पाबळे,बाबासाहेब गाडेकर, नंदाताई पवार, महावीर ढक्का,रमेश गौरक्षक,जीवन सले,विनोद रत्नपारखे, मोहन इंगळे, सय्यद अजहर, आरेफखान,शेख शकील,अजय भरतीया, संगीता पांजगे,जावेद अली, बाबासाहेब सोनवणे,शेख इब्राहिम,गणेश चांदोडे,फकिरा वाघ,रहीम तांबोळी,कलीम वस्ताद यांच्यासह जालना शहर व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *