ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओबीसीच्या न्यायहक्कावर गदाआल्यास मंत्री पदाचा राजीनामा देईल ना. वडेट्टीवार

December 5, 202016:13 PM 28 0 0

जालना (प्रतिनिधी): ओबीसी समाजाचे न्याय हक्क कुठल्याही परिस्थितीत अबाधित ठेवले जातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला तर वेळप्रसंगी आपण मंत्री पदाचा राजीनामा देऊ अशी कणखर भूमिका ओबीसी, मदत, पुनर्वसन आणि विमुक्त जाती भटक्या जमातीचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना शनिवारी रोजी जालना येथे घेतली. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांच्या निवासस्थानी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी रोजी सदिच्छा दिली यावेळी ते पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते . याप्रसंगी आमदार राजेश राठोड ,बबनराव तायवडे ,बाळासाहेब सानप शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद ,प्रदेश सचिव प्रा. सत्संग मुंढे ,जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राम सावंत ,चंद्रकांत रत्नपारखे ,ऍड संजय काळबांडे ,बालाजी मुंढे ,संतोष जमधडे ,प्रकाश जायभाये ,प्रा.दीपक दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री वडेट्टीवार यांच्या राजेंद्र राख यांनी शाल व पुष्पहार देवुन सत्कार केला.

श्री वडेट्टीवार म्हणाले कि मराठा आरक्षण हा विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे त्यांच्या आरक्षणासंबंधी आमचा काडीमात्र विरोध नाही परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता काम नये हि आमची स्पष्ट भूमिका आहे. ओबीसी समाजाला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून न्यायहक्क मिळवून देण्यासाठी आपले पुरेपूर प्रयत्न राहणार आहे . नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघात भाजपाची विजयाची परंपरा ओबीसी समाज एकजूट झाल्याने आणि तसेच महाविकास आघाडी सरकारच्या कामामुळे मोडीत निघाली आहे. या मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विजयामुळे भाजपाच्या विचाराविरुद्ध देशामध्ये मोठा संदेश गेला आहे . असे त्यांनी यावेळी सांगितले .

यावेळी मंत्री वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी विविध मागण्या संदर्भात चर्चा केली .याप्रसंगी प्रकाश कांगणे , देवेंद्र बारगाजे , मधुराज डोईफोडे , बाबाखेर करवाटे , संदीप वाघ , शिवाजी वाघ , संदीप हुसे , ऍड कुर्‍हाडे ,विष्णू कारके आदींची उपस्थिती होती .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *