आता तरी कोरोणा तू जाशील का
शाळा लवकर सुरू होऊ देशील का
अचानक कोरोणाची साथ आली
देशामध्ये सगळीकडे बंदी झाली
हेळसांड शिक्षणाची थांबवशिल का….१
ऑनलाईन शिक्षणाचा आला वारा
गरीबांच्या मुलांचे रे वाजले बारा
हाक त्यांच्या र्हदयाची ऐकशील का…..२
मुलांवाचून शाळा आमुची ओस पडली
ज्ञानांच्या कणांना मुले पारखी झाली
पुण्य त्यांच्या शिकण्याचे घेशील का….३
दुरूनच आम्ही ज्ञानदान करतो
दुरूनच स्वाध्यायाला छान म्हणतो
शाबासकीची थाप देऊ देशील का….४
आता तरी कोरोणा तू जाशील का
शाळा लवकर सुरू होऊ देशील का…..
श्रीमती रंजना उद्धवराव सांगळे
प्रा.प.शिक्षिका. प्रशाला जाफराबाद
जि.जालना
Leave a Reply