ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

फलटण शहरातील वीज वितरण कंपनीच्या वायरमनला १ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले

March 9, 202212:14 PM 29 0 0

फलटण (सई निंबाळकर ) :- फलटण शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा प्रधान तंत्रज्ञ (वायरमन) कार्तिकीस्वामी तुकाराम गुरव याला १ हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असल्याची घटना घडली आहे.सलग तिसऱ्या वर्षी महावितरणच्या कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक झाल्याने फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी दिलेली माहितीनुसार, मंगळवार दिनांक ८ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय फलटण येथील अर्बन शाखा नं -१ फलटण याठिकाणी प्रधान तंत्रज्ञ (वायरमन) पदावर असणाऱ्या कार्तिकीस्वामी तुकाराम गुरव (मूळ रा. मु.पो.पिंगुरी, ता.पुरंदर, जि.पुणे तर सध्या रा.शासकीय निवास स्थान एम.एस.ई.बी कॉलनी फलटण) यांनी संबंधित तक्रारदार यांचा जुना मिटर काढून नविन मिटर जोडणीसाठी १ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. संबंधित वायरमन तक्रारदार यांच्याकडून १ हजार रुपये लाच फलटण शहरातील हॉटेल आर्यमान येथे स्विकारल्यानंतर त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी रंगेहाथ पकडले. सबधित महावितरण कर्मचाऱ्याच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
आहे.लाच मागणी संदर्भात तक्रारी असल्यास पोलिस उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंध विभाग, सदर बझार, सातारा येथे अथवा कार्यालय दूरध्वनी क्रमांक ०२१६६-२३८१३८ तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्यावतीने करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *