ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

JNPT सह परिसरातील सर्व उद्योगा मध्ये प्रकल्पग्रस्त आणि भूमीपुत्रांना सुरक्षा रक्षक म्हणून रायगड सुरक्षा मंडळामध्ये भरतीचा मार्ग झाला मोकळा

January 17, 202215:29 PM 36 0 0

उरण दि 16(राघवी ममताबादे ) : कामगार विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील तसेच सुरक्षा रक्षक कामगारांचे प्रतिनिधी प्रमोद ठाकूर यांच्या ठाम भूमिकेमुळे विश्वस्त मंडळाला कामगार हिताचे निर्णय घ्यावे लागले आहे.न्हावा शेवा बंदर कामगार संघटना(अंतर्गत) च्या 12 वर्षांच्या न्यायालयिन लढाईला आता मोठं यश प्राप्त झाले आहे.जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT )मध्ये रायगड सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक ठेवायचे की महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे (MSF) हा वाद 2013 पासून मा. मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे.

दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय JNPT प्रशासनाने घेतला असून त्यांना 31 मार्च 2022 ही अंतिम मुदत दिलेली आहे. हा विषय काल 14 जानेवारी रोजी झालेल्या JNPT विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चर्चेला आला असता कामगार विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांच्या ठाम भूमिकेमुळे यापुढे JNPT आणि परिसरात आवश्यक असणारे सर्व सुरक्षा रक्षक कायदेशीर तरतुदी आणि शासन निर्णयाप्रमाणे भरती करण्याचे JNPT चे अध्यक्ष संजय शेट्टी यांनी मान्य केले असून याविषयी अंतिम निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात अंतर्गत संघटने सोबत बैठक आयोजित करण्यास त्यांनी सूचना केल्या आहेत.अशी माहिती कॉम्रेड भूषण पाटील यांनी दिली.न्हावा शेवा बंदर संघटना (अंतर्गत) ने 2009 मध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये (WP- 311/2009) मा.मुंबई उच्च न्यायालयाने,डिसेंबर 2012 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार, JNPT मध्ये खाजगी एजंसीमार्फत काम करणाऱ्या 117 सुरक्षा रक्षकांना रायगड सुरक्षा मंडळामध्ये नोंदीत (Registered) करून घेण्यात आले होते तर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार JNPT ही आस्थापना मुख्य मालक (Principal Employer) म्हणून रायगड सुरक्षा मंडळामध्ये नोंदीत झालेली असल्याने त्यांना फक्त रायगड सुरक्षा मंडळानेच तैनात केलेले सुरक्षा रक्षक ठेवणे बंधनकारक असताना देखील JNPT ने सदर 117 सुरक्षा रक्षकांना कामावर ठेवण्यास मनाई तर केलीच वर PUB परिसरातील सुरक्षेसाठी ऑगस्ट 2013 पासून महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे (MSF)55 सुरक्षा रक्षक तैनात करून रायगड सुरक्षा मंडळास सुरक्षा रक्षकांची वेतनाची रक्कम देण्यास ठाम नकार दिला होता.तेव्हापासून हा वाद पुन्हा मा. मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे.

मा. मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार JNPT मुख्य मालक म्हणून रायगड सुरक्षा मंडळात नोंदीत असल्याने कायद्यानुसार JNPT ला आवश्यक असणारे सुरक्षा रक्षक आता रायगड सुरक्षा मंडळाकडूनच घेणे बंधनकारक असल्याने कंत्राट रद्द केलेल्या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या 55 सुरक्षा रक्षकांच्या 31 मार्च नंतर रिक्त होणाऱ्या जागांवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यासाठी तसेच सध्या टाऊनशीप मध्ये कार्यरत असलेल्या 88 सुरक्षा रक्षकांना साप्ताहिक सुट्टी घेण्यास JNPT ने भाग पाडल्यास त्यांना रिलिव्हर म्हणून आवश्यक असणाऱ्या 14 सुरक्षा रक्षकांची देखील JNPT ला रायगड सुरक्षा मंडळाकडे मागणी करावी लागेल .त्याचप्रमाणे भविष्यात JNPT सेज मध्ये येणाऱ्या उद्योगांना मोठया प्रमाणात सुरक्षा रक्षकांची आवश्यकता लागणार असून JNPT विश्वस्त मंडळाच्या या निर्णयामुळे हे सर्व सुरक्षा रक्षक रायगड सुरक्षा मंडळाकडूनच घ्यावे लागतील. परंतु रायगड सुरक्षा मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर (समुच्चय पूल ) आता उरण तालुक्यातील एकदेखील उमेदवार शिल्लक राहिला नसून ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प उभा आहे त्यांना प्रथम मग त्या गावातून नंतर त्या तालुक्यातील तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून नोंदीत करून घ्यावे या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच JNPT विश्वस्त मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी रायगड सुरक्षा मंडळास नव्याने भरती प्रक्रिया राबविणे भाग पडणार आहे.अंतर्गत संघटना याकरिता प्रयत्न करणार असून रायगड सुरक्षा मंडळाने तसे न केल्यास JNPT प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्रांचा प्रचंड मोर्चा मंडळाच्या कार्यालयावर नेण्याचा निर्धार कॉम्रेड भूषण पाटील यांनी बोलून दाखविला.या निर्णयामुळे स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त,सुरक्षा रक्षक कामगार वर्गा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *