ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने चाणजे ग्रामपंचायत मध्ये कोविड लसीकरण केंद्र सुरु

July 29, 202112:31 PM 29 0 0

उरण (संगिता पवार ) देशात व राज्यात कोरोनाने हाहा;कार माजविण्यास सुरुवात केली आहे .राज्यातील सर्व भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून काही ठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.उरण तालुकयात कोरोना रुग्ण आहेत.त्यामुळे जनतेनी वेळीच योग्य ती खबरदारी घेतली नाही तर भयानक परिस्थिती चा सामना करण्याची वेळ येऊ शकते या साठी प्रत्येकांनी आपल्या सुरक्षितेच्या दृष्टीने जागृत राहुन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे .


चाणजे ग्रामपंचायत हददीतील नागरिकांना कोरोना लस मिळावी या उदेश्याने आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने बुधवार (दि. २८ )जुलै पासून चाणजे ग्रामपंचायत येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे . यावेळी चाणजे ग्रामपंचायत सरपंच मंगेश थळी ,उपसरपंच अशोक नाखवा ,सदस्य रवींद्र कोळी ,सदस्य अजय म्हात्रे ,व ग्रामस्त उपस्थित होते .
वय १८ ते ४४ वर्षे व ४५ वर्षे वरील सर्वांना कोविशील्ड लसीकरण करण्यात येणार आहे .सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत लस दिली जाईल .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *