ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिल्ह्यातील शाळांमध्ये पुन्हा खिचडी शिजू लागल्याने विद्यार्थी उपस्थितीत झाली वाढ

March 23, 202214:38 PM 42 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी,गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि पोषण आहाराद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास व्हावा या उदात्त हेतूने माध्यन्ह भोजन योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार योजना शासनाने सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटांमुळे शाळा कधी ऑनलाइन तर कधी ऑनलाइन सुरू होत्या.त्यामुळे मार्च 2020 पासून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेत पोषण आहार शिजवून देणे बंद करण्यात आले होते.
त्याऐवजी शासनाने कोरडा तांदूळ,विविध डाळी ,हरभरा इत्यादींचे विद्यार्थ्यांना वाटप केले होते. तथापि सध्या कोरोनाचे संकट दूर झाल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 15 मार्च 2022 पासून शाळा पुन्हा नियमितपणे सुरू झाल्या आहेत.त्याचबरोबर शाळेतच पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात यावे असे आदेश शिक्षण विभागाने दिले होते.
याच अनुषंगाने 15 मार्च ते एप्रिल या 43 दिवसाच्या कालावधीत शालेय पोषण आहार शाळेत दिला जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश शाळेत पोषण आहार शिजवून दिला जात आहे .त्यामुळे एरवी घटलेली विद्यार्थी संख्या पुन्हा वाढू लागली आहे .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *