ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या विशेष प्रयत्नांनी व मध्यस्थीने फ्युचर झेड (जी.टी.आय.) मधील आर.टी.जी. ऑपरेटर कामगारांना भरघोस पगार वाढ

November 10, 202116:55 PM 8 0 0

उरण दि ९(संगीता ढेरे ) : उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार तसेच शिवतेज कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोहरशेठ भोईर यांच्या सततचा पाठपुरावा योग्य मध्यस्थी तसेच मार्गदर्शनामुळे जी.टी.आय.पोर्ट आस्थापनेतील फ्युचर झेड आर.टी.जी. ऑपरेटर शिवतेज कामगार संघटनेचे सभासाद/कामगार (आर.टी.जी. ऑपरेटर ) यांना भरघोस पागार वाढीचा (रु.१८६५०/- चार वर्षाकरिता) करारनामा फ्युचर झेड (जि.टी.आय. पोर्ट कंत्राटदार) व शिवतेज कामगार संघटना यांच्यात करण्यात आला.

करारामधील प्रमुख मुद्दे
१. रु.१८६५०/- चार वर्षाकरिता
२. ३ लाख मेडिकल पॉलीसी,
३. ५० लाख रुपयांची मरणोत्तर कुटुंबियांसाठी पॉलिसी
४. ८.३३% बोनस+२०,००० एक्सग्रेसिया(अतिरिक्त)
५. इंसेंटिव्ह मध्ये भरघोस वाढ
६. सरकारी नियमाप्रमाणे सुट्ट्या, कॅजुअल लिव्ह, सिक लिव्ह, पेड लिव्ह मध्ये वाढ
७. घरतील व्यक्तीच्या मृत्यू नंतर रजा आणि पितृत्व रजा मंजूर
८. सदर करार हा एप्रिल २०२० ते मार्च २०२४ पर्यंत लागू आहे
सदर करारावेळी कार्यसम्राट माजी आमदार, शिवतेज कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोहरशेठ भोईर, विधानसभा संपर्कप्रमुख तथा कामगार नेते महादेव घरत, शिवतेज कामगारसंघटनेचे सचिव तथा कामगार नेते महेंद्र सावंत, फ्युचर झेडचे चिराग जगद, ह्रिदयनाथ कांबळे, शिवतेज कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष मंगेश पाटील, युनिट लीडर सुरेश पाटील, जितु काटकर, उपस्थित होते.
यावेळी कामगार वर्गातून माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे कौतुक करण्यात आले. तसेच शिवतेज कामगार संघटना व कामगार वर्ग कडून जि.टी.आय. व फ्युचर झेड व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.या करारामुळे कामगार वर्गात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *