ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला पोहोचल्याने, युक्रेनला रक्ताच्या लाथोळ्यातुन कोण वाचविणार?

April 12, 202216:53 PM 35 0 0

रशिया -युक्रेन युध्द वेळीच थांबले नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो.आज रशिया-युक्रेन युद्धाला 48 दिवस लोटुन गेले.तरीही युक्रेनमधील रक्तपात थांबलेला नाही.पुतिन यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण युक्रेन स्मशानभूमी बनुन खंडर झाली आहे.अमेरिका व रशिया हे युद्ध थांबविण्याच्या मुडमध्ये नसल्याचे स्पष्ट दिसुन येते.ही बाब युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्या लक्षात अजुन पर्यंत आलेली नाही.यामुळेच आज युक्रेन पुर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.कारण रशियाला युक्रेन पाहिजे आहे.परंतु युक्रेन रशियाच्या कब्जात जावुदेणार नाही यापध्तीने अमेरिका आपली खेळी खेळत आहे.याकरीता अमेरिकेने जेलेन्स्कीला आपला मोहरा बनवीला आहे.परंतु यात लाखोंच्या संख्येने युक्रेन नागरिक मरत आहे त्याचे काय? बलाढ्य देशांच्या वर्चस्वाच्या लढाईत युक्रेन मधील निरअपराध्यांचा बळी का जावा?रशिया-युक्रेन संघर्षामुळे लाखोंच्या संख्येने लोकांनी आपले घर-दार सोडून पलायन करून शेजारच्या देशामध्ये आश्रय घेतला आहे.या युध्दात अनेकांनी आपले आप्त -नातेवाईक मोठ्या प्रमाणात गमाविले आहे.रशिया-युक्रेन युध्दाचा फायदा अमेरिका व चीन घेत आहे ही बाब जगजाहीर आहे.तरीही युनो शांत बसलेला दिसुन येतो.रशियाच्या हेकेखोरीमुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिंनगी केव्हाही व कधीही उडु शकते.कारण रशिया -युक्रेन युद्ध हे आता युक्रेन पुरतेच सिमित नसुन अमेरिका व नाटो यांच्या विरुद्ध रशिया असे युद्ध झाले आहे.कारण अमेरिका, ब्रिटन सह नाटो देश युक्रेनला संपूर्ण युद्ध सामुग्रीचा मोठ्या प्रमाणात मदत करीत आहे.ही बाब रशिया चांगल्याप्रकारे जाणते अशा परिस्थितीत रशियाकडून युक्रेन युध्दाची परिस्थिती आवाक्याबाहेर गेली तर रशिया अवश्य अनुबॉम्बचा वापर करेल याला नाकारता येत नाही.त्यामुळे गेल्या दिड महिन्यांपासून सुरू असलेला नरसंहार रशियाने ताबडतोब थांबला पाहिजे.रशियाने युक्रेन विरूद्ध एवढी आक्रमक भूमिका कधीच घेतली नसती.परंतु अमेरिका, ब्रिटन व नाटो देशांनी वेळोवेळी रशियाला उकसविण्याचे काम केले.त्यामुळेच पुतीन युक्रेनविरूद्धची लढाई ही आपल्या स्वाभिमानाची लढाई म्हणून लढत आहे.यासाठी त्यांनी पुर्णपणे कंबर कसली असून आर-पारचा पवित्रा स्वीकारला आहे.हे तेवढेच सत्य आहे की या लढाईमुळे फायदा कोणालाही नाही.परंतु नुकसान सर्वांनाच भोगावे लागणार आहे.कारण रशिया -युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.याचा विचार अमेरिका व रशियाने केला पाहिजे.परंतु आता रशिया एकही पाऊल मागे हटायला तयार नाही.त्यामुळे रशिया-युक्रेन युध्द महाविनाकडे वाटचाल करताना दिसत आहे.अमेरिका हे युद्ध थांबवू शकतो.परंतु तसे कदापि शक्य नाही.कारण अमेरिकेच्या बायोवेपन्स लॅब युक्रेनमध्ये असल्यामुळे युक्रेनवर रशिया कब्जा शक्य नाही.अशा परीस्थितीत हे स्पष्ट होते की सध्या युक्रेन-रशिया युद्ध नसुन अमेरिका विरूद्ध रशिया असे युद्ध सुरू आहे.परंतु या युध्दात आजच्या परिस्थितीत युक्रेन खंडर बनल्याचे दिसून येते.साडेचार करोड लोकसंख्या असलेला देश आज रक्ताच्या लाथोळ्यात भरबटला आहे.गेल्या 48 दिवसात युक्रेनच्या सुंदरतेला रशियाने स्मशानभूमीत रुपांतरीत केल्याचे दिसून येते.हा खुनी संघर्ष ताबडतोब थांबायला हवा.कारण हे युद्ध अमेरिका-नाटो विरूद्ध रशिया असे सुरू आहे.परंतु निरअपराध युक्रेन नागरिकांना, मुलांना, वृध्दांना मृत्यूच्या खाईत लोटले जात आहे ही अत्यंत दु:खद आणि गंभीर बाब आहे हे कोठेतरी थांबायला हवे.मानुसकी या नात्याने जो.बायडन,जेलेन्स्की व पुतीन यांनी एक-एक पाऊल मागे घेवून युक्रेन मधील खुनी तांडव थांबवीला पाहिजे.यातच खरी मानुसकी व महाशक्तीची ताकद दिसून येईल.असेही सांगण्यात येते की रशियन सैन्याकडून युक्रेन नागरिकांचा छळ करण्यात येत आहे.त्यामुळे हे घृणास्पद कृत्य थांबवायचे असेल तर ताबडतोब युध्द थांबायला हवे.जगात इतर कोणत्याही देशांत युद्ध होत असेल तर अमेरिका व रशिया मध्यस्थी करून युद्ध थांबवायचे असे अनेकदा आपण पहाले आहे.परंतु रशिया -युक्रेन युद्ध हे फक्त नावालाच आहे.हे युद्ध खरे पहाले तर रशिया विरूद्ध नाटो-अमेरीका आहे हे आता सिद्ध झाले आहे.कारण ही लढाई रशिया -युक्रेन पुरती सिमित असती तर 8 ते 15 दिवसात रशिया व अमेरिकेच्या मध्यस्थीने हे युद्ध संपुष्टात आले असते.परंतु अमेरिकेची नाळ युक्रेनमध्ये गाडली असल्याने रशियाला युक्रेनवर सहज विजय मिळविता येणार नाही.त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध आता अमेरिका विरूद्ध रशिया झाल्याचे स्पष्ट दिसून येते.या युध्दात दोन्ही बलाढ्य देश आमने-सामने असल्याने यात युनोने ताबडतोब हस्तक्षेप करून युद्ध थांबविले पाहिजे.कारण या युध्दात मानवीय व वित्तीय हानी युक्रेनची मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि युक्रेन आजच्या परिस्थितीत 100 वर्षे मागे गेल्याचे दिसून येते.युक्रेनला मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम अमेरिका व नाटोने केले तर रशियाने निरअपराध्यांचा बळी घेवुन क्रृर कृत्य करून मानवजातीला कलंकित केले.रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी युनो, जागतिक न्यायालय,भारत, इजरायल सह जगातील संपूर्ण देशांनी युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाऊल उचलण्याची नितांत गरज आहे.कारण हे युद्ध 24 फेब्रुवारी 2022 ला सुरू झाले व या युध्दात अत्याधुनिक मिसाईल, दारूगोळा,हवाईहल्ले क्लस्टर बॉम्ब अशा घातक बॉम्बचा सूध्दा उपयोग आता पर्यंत करण्यात आला व आताही होत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.असेही सांगण्यात येते की रशिया पुढे चालून युक्रेनवर घातक प्रहार करू शकतो.यामुळे युक्रेनचे नागरिक अत्यंत भयभीत झाले आहे.युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती पहाता अंगावर शहारे येतात अशा प्रकारच्या भयानक यातना व त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.म्हणजेच युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती अत्यंत भयावह व चिंताजनक झाली आहे.मानवजातीचे व मानुसकीचे पालन करून संवादाच्या माध्यमातून रशियाने हे युद्ध ताबडतोब थांबवायला पाहिजे.यातच बलाढ्य देशांची मानुसकी जगापुढे दिसून येईल.

लेखक

रमेश कृष्णराव लांजेवार

मो. नं.9921690779, नागपूर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *