ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिलांनी आपल्या कलागुणांना वाव देत शिक्षणाच्या जोरावर अधिक सक्षम व्हावे — प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा कि. केवले

October 15, 202115:22 PM 42 0 0

जालना  – आजघडीला महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नसुन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. महिलांनी आत्मविश्वास मनी बाळगुन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत शिक्षणाच्या जोरावर अधिक सक्षम व्हावे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा कि. केवले यांनी केले. पॅनइंडिया लिगल अवेअरनेस कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण व अखिल भारतीय जनजागृती अभियान कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्रीमती केवले बोलत होत्या.

व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश-1 ए.एस. राजंदेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव आर.बी. पारवेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती केवले म्हणाल्या, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो.त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे दोन महापुरुषांचा हात असुन महिलांना समान हक्क व संधी मिळवुन देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन देणारे महात्मा ज्योतिबा फुले. या महापुरुषांच्या योगदानामुळेच महिलांना समान संधी व शिक्षण मिळाल्याने आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. आपले कर्तृत्व हे शिक्षणातुन दाखवता येत असल्याने महिलांनी त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊन आपल्या कार्याचा ठसा जनमानसांसमोर ठेवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन शासनाच्या अनेकविध योजनांची व उपक्रमांची माहिती पोहोचवण्यात येते. महिलांसाठीही अनेक कायदे आहेत. या कायद्यांची माहिती ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करत महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्यास कायद्यांचा सदुपयोग व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती आर.एस. अडकिने यांनी मालमत्ता व महिलांचे अधिकार या विषयावर तर राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड पी.जे.गवारे यांनी महिलांसाठी असलेल्या विविध कायद्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले व सरस्वती प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन श्रीमती अश्विनी धन्नावत यांनी केले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांच्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा कि. केवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिंदल स्कुलच्या श्रीमती शुभ्रा वर्मा, हेरीझोन मेंबर इनरव्हील क्लबच्या श्रीमती नेत्रा भक्कड, दानकुंवर महिला महाविद्यालयाच्या श्रीमती विद्या पटवारी, योगशिक्षिका श्रीमती अश्विनी धन्नावत, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती आगलावे, पोलीस उपनिरीक्षक एस.बी. राठोड, भरोसा सेलच्या श्रीमती विद्या झिरपे यांच्यासह वनस्टॉप सेंटरच्या माध्यमातुन उत्कृष्ट सेवा देणारे राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड पी.जी. गवारे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हापरिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संगिता लोंढे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर.एन. चिमिंद्रे यांच्यासह न्यायिक व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी, अंगणवाडी सेविका, विविध महाविद्यालयाच्या प्राचार्या आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *