ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिलांनो केंद्रातील विविध योजनांचा लाभ घ्या

September 3, 202114:00 PM 62 0 0

उरण ( संगिता पवार ) स्वयं सहाय्यता महिला बचत गटासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ,व प्रधानमंत्री पेन्शन विमा योजना अश्या विविध प्रकारच्या योजना आहेत त्यांचा लाभ घ्या महिलांनी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः सक्षम झाले पाहिजे आजची महिला अबला नसून ती सबळा झाली आहे .आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आली आहे असे प्रतिपादन बचत गटाच्या सीआरपी .निर्मला प्रभाकर घरत यांनी केले .


म्हैशेश्वर स्वयं सहाय्यता महिला बचत, गौरी महिला बचत गट ,गावदेवी महिला बचत गट यांची बैठक बचत गटाच्या सीआरपी निर्मला प्रभाकर घरत यांच्या अध्यक्षते खाली ग्रुपग्रामपंचायत कार्यालय करळ येथे नुकतीच संपन्न झाली बचत गटातली महिलांना केंद्राच्या बचत गटासाठी असलेल्या विविध योजनाची माहिती देण्यात आली त्याच प्रमाणे महिलांना विमा काढण्यासाठी लागणारी सर्व माहिती बचत गटाच्या सीआरपी निर्मला घरत यांनी दिली .
या बैठकीस म्हैशेश्वर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा तेजस्विनी कडू , गौरी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा नर्मदा तांडेल , गावदेवी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा सुषमा तांडेल व बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *