खोपोली ( अदिती पवार ):- खोपोली शहरातील नागरिकांनी पाणीपट्टी व घरपट्टीसह हजारों रूपयांचा कर भरायचा, पण खोपोली नगर परिषदेकडे सुविधा मागायच्या नाहीत, असा प्रकार आहे. जर सुविधा मागितल्या तर सुविधा मागणाऱ्या नागरिकांना साम, दाम, दण्ड, भेदचा उपयोग करुन शांत केले जाते. गेली अनेक वर्ष हा प्रकार सुरु असून काही महिन्यांपूर्वी मुकुंद नगर मधील नागरिकांवर ही वेळ आली होती. आज सुभाषनगर येथील नागरिकांवर सुध्दा खोपोली नगर परिषद कर्मचाऱ्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेल्या महिन्याभरापासून सुभाषनगर परिसरात पुरेशा दाबाने व कमी कालावधीसाठी पाणी येत नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याला फोर्स (दाब) नसल्याने पहिल्या मजल्यावरील नागरिकांना पाणी मिळत नाही आहे. तसेच शौचालयावरील पाण्याच्या टाक्या देखील रिकाम्या राहत आहेत. नागरिकांच्या समस्यांचा पाठपुरावा करीत ‘केपी न्यूज’च्या वतीने पाणी पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
मुख्याधिकारी अनुप दुरे व लोकप्रतिनिधींना देखील सदर प्रकरणी अवगत केले गेले आहे. मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून त्यांनी पाणी पुरवठा विभाग व प्लंबर, पाणी पुरवठा करणारे कर्मचारी यांना पाणी पुरवठा व्यवस्थित करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी तोडगा काढण्याऐवजी संबंधित कर्मचारी फक्त पाणी पुरवठा होत असल्याचा व्हिडिओ काढून आपण कसे व्यवस्थित आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत शुक्रवारी देखील खोपोली नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सुभाषनगरचा दौरा केला. यावेळी घराघरात घुसून नळातून येणाऱ्या पाण्याचा व्हिडिओ बनविण्यात आला. मात्र नळातून पहिल्या मजल्यावर तेथील टाक्यांमध्ये जाणारे पाणी याचा व्हिडिओ न करता घरातील नळातून घरात येणाऱ्या पाण्याचे व्हिडिओ बनविण्यात आले. दरम्यान, जेव्हा महिलांनी पाणी येत नाही. पहिल्या मजल्यावर पाणी चढत नाही, असे सांगितले तर तेव्हा महिलांच्या शंकांचे निरसन करण्याऐवजी महिलांना आडवे-तिडवे उत्तरे देण्यात आली. ऐवढेच नव्हे सुभाषनगरमध्ये येवूनही दमदाटी करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींना लक्ष घालण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात आला, तरी दृष्काळसदृश्य परिस्थितीवर उपाययोजना न करता महिलांना दमदाटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकारी अनुप दुरे कारवाई करणार का? असा सवाल सुभाषनगरकरांनी उपस्थित केला आहे. पाणीटंचाईमुळे निवडणुकीत विरोधात वातावरण निर्माण न होण्यासाठी लोकप्रतिनिधींचा अनोखा फंडा ? :- खोपोली शहरातील नागरिकांनी पाणीपट्टी व घरपट्टीसह हजारों रूपयांचा कर भरायचा, पण खोपोली नगर परिषदेकडे सुविधा मागायच्या नाहीत, अन्यथा जिवाशी संपविले जाईल, असा प्रकार सुरू आहे. मुकुंदनगर वासियांनी रस्ता मागितल्यानंतर सुध्दा खोपोली नगर परिषदेने पोलीस प्रशासनाला हाताशी घेवून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला होता. पण रहिवासी महिलांनी तत्कालीन मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते. आता सुभाषनगर येथील नागरिकांनी पाणी मागितले असता महिलांना दमदाटी केली गेली. दुसरीकडे पाणी टंचाईमुळे आगामी खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींविरोधात वातावरण निर्माण होत असल्याने विरोध मोडून काढण्यासाठी त्यांच्याकडूनच ही खेळी खेळण्यात आला असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मागील पाच वर्षात विकासकामे केली नाहीत व आता नागरिकांकडून पाणी पुरवठ्याबाबत आवाज उठविण्यात येत असल्याने काहीही कारणे दिले जात आहेत, असेही महिलांकडून बोलले जात आहे.
Leave a Reply