महिला दिन जल्लोष
ही तयारी धावाधाव
पुळका हा स्त्रीयांचा
आणतो केवढा आव
स्त्रीला देवी मानतो
दुर्गा महाशक्ती नाव
मग उगाचं का करतो
मंदीरा जाया मज्जाव
स्त्रिया स्वतंत्र म्हणतो
धावावे तिने भरधाव
आम्हीचं ठरवतो तिचा
कसा असावा पेहराव
आरक्षण तैतीस टक्के
वाजत गाजत ठराव
महिलाआरक्षीत जागी
कशास बसता हो राव
दिवसा पुरता केवळ
नको उगाचं बडेजाव
मनी सन्मान नारीचा
प्रसिद्धीची नको हाव
-हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996..
www.kavyakusum.com
Leave a Reply