जालना दि. 22 :- जालना येथे येत्या रविवारी काढण्यात येणार असलेल्या ओबीसी समाजाच्या मोर्चासाठी महिलांनी देखील पुढाकार घेतला आहे. जालना शहरातील विविध भागात ओबीसी समाजातील महिला व युवतीच्या बैठका घेऊन मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महिला पदाधिकारी समन्व्य समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
ओबीसी महिला मोर्चात समन्व्य समितीच्या पदाधिकारी प्रा. डॉ. रेणुका भावसार, शोभा आंबेकर, सुनंदा अबोले, कौशल्य्या खरात, उमा क्षिरसागर, विना दर्जे, रंजना दरबस्तवार यांनी जालना शहरातील शनिमंदीर, मंठा चौफुली, यादव नगर, बजरंग नगर आदी भागात ओबीसी समाजातील महिला व युवतींच्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर बैठका घेऊन मोर्चा मागील भूमिका विषद केली. व मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची आवाहन करण्यात आले. या बैठकांना उपस्थित महिला व युवतींनी उत्सफुर्त प्रतिसाद देऊन ओबीसी मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्धार केला.
Leave a Reply