ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मालसई येथील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळेस महिलांचा प्रतिसाद

September 23, 202115:14 PM 18 0 0

रोहा कृषिविभागाच्या वतीने बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी मालसई येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महिला सक्षमीकरणासाठी या योजना कशा लाभदायक आहे याचे मार्गदर्शन या वेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांना केले. महिलांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आपला छोटा उद्योग उभा करावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. तसेच महिला बचत गट व महिला समुहाने एकत्रित संघटित होऊन काम करणे गरजेचे आहे.

शासन आपणास हातभार लावण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करीत आहे,आपण त्यांचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक श्री.दिगंबर साळे यांनी केले. श्री.सुतार यांनी या योजनांची चांगल्या प्रकारे माहिती उपस्थित महिलांना दिली. यावेळी पत्रकार रविना मालुसरे यांनी मालसई मधील महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक दिगंबर साळे,श्री.सुतार व पल्लवी उबाळे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिका मालुसरे तसेच मालसई मधील महिला बचत गटांच्या पदाधिकारी, महिला मंडळाच्या पदाधिकारी व गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *