ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिलांचा आवाज बुलंद होणार…

November 26, 202016:45 PM 149 0 0

होय ! खरं आहे, आता महिलांचा आवाज बुलंद होणार आहे. ज्या महिलांना त्यांच्या हक्कापासुन आणि त्यांच्या अधिकारांपासून दुर ठेवलं गेले आहे अशा महिलांना त्यांच्या अधिकाराची आणि कर्तव्याची पुर्ण माहिती मिळणार आहे. त्यांच्या अधिकाराची आता जनजागृती होणार आहे. कायदा, अधिकार, समाज, सत्य, असत्य, हक्क, शासनाने महिलांसाठीचे राबविलेले उपक्रम, विविध योजनांची इत्यंभुत माहिती, भारतीय राज्यघटना यासह बरंच काही रोज महिलांना वाचायला मिळणार. त्यामुळे महिला आता नक्कीच जागृत होणार असून तीला तीचे हक्क गाजवता येणार आहेत. महिलांच्या मनातील भावना, त्यांचे विचार खुले पणाने मांडता येणार आहेत. एवढेच नाही तर आरोग्य आणि कायद्याचे ज्ञान आणि सल्ला देखील महिलांना घरबसल्या मिळणार आहे. होय नक्कीच ! कारण आम्ही आहोत भारताच्या मातीतल्या भारताच्या अष्टभुजा-हिरकण्या, म्हणूनच साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी ठरणार आहे सर्वांच्या आवडीचे साप्ताहिक !

महाराष्ट्रातल्या पवित्र भुमीत आम्ही रोवलेल साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीचे रोपटे आपल्या सर्व महिलांच्या साक्षाने देशभरात न्यायचे आहे. कारण महिलांचा आवाज देशाच्या कोणत्याही कोपर्यात दाबला जात असेल तर तो आवाज साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी जगासमोर आणेल हे नक्की आहे. विशेष म्हणजे महिला पत्रकार संख्येने फार कमीच आहे. म्हणून तर पत्रकारीतेच्या क्षेत्रात महिलांच्या संख्येत वाढ करायची आहे. खुप काही असतं मनात, पण कुणा जवळही बोलता येत नाही, आपले मत कोणापुढेही मांडता येत नाही. आपली भावना आणि आपले विचार मनातच ठेवावे लागतात. अनेकवेळा इच्छा असूनही मनात सतत घुसमट असते. हीच घुसमट बंद करण्यासाठी आणि आवात बुलंद करण्यासाठी अष्टभुजा हिरकणी धावणार आहे. आजपर्यंत महिलांचे आवाज दाबणार्यांनो आता यापुढे असे होणार नाही. नारी शक्तीचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि त्यांचे हक्क गाजवण्यासाठी, त्यांच्या मनातले विचार मांडण्यासाठी अष्टभुजा हिरकणी सक्रीय होत आहे. त्यामुळे देशाच्या सर्वच क्षेत्रात कार्य करणारी महिला आता मोठ्या अभिमानाने आपले विचार मांडू शकणार आहे.

उचला पेन आणि करा लिहायला सुरुवात. आपले मत आणि विचार परखडपणे मांडा, आम्ही देऊ त्याला प्रसिध्दी, आम्ही पोहचवणार तुमचे विचार प्रत्येकापर्यंत, फक्त तुमची तयारी ठेवा, अष्टभुजा हिरकणी महिलांची पाठीराखी सोबत आहेच. अष्टभुजा हिरकणी दर आठवड्याला विविध क्षेत्रातल्या महिलांचा गौरव करुन त्यांचे साहित्य, त्यांचे विचार, त्यांनी केलेले परिश्रम, त्यांनी गाठलेले यशाचे शिखर यासह अनेक विषय मांडणार आहे. ज्यांनी यशस्वी शिखर गाठले अशा सर्व महिलांच्या मुलाखतीसह कार्याचा गौरव साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीच्या माध्यमातुन केला जाणार आहे. या गौरवाचे वाटेदार आपणही नक्कीच व्हावे. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पायलट, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी, साहित्यीक, उद्योग, व्यवसाय, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, समाजसेवक, राजकीय, धार्मीक, शैक्षणीक यासह हजारो क्षेत्रात काम करणार्या आणि यशस्वी महिलांच्या मुलाखती तसेच त्यांच्या परीश्रमाची माहिती आम्ही देणार आहोत दर आठवड्याला, तर आजप आपले अंक राखुन ठेवा, आमच्या सोबत काम करा, आपल्या आजुबाजुला असलेल्या हिरकण्याची माहिती आम्हाला द्या, आम्ही नक्कीच त्यांच्या कार्याचा गौरव करणार आहोत.

Categories: संपादकीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *