ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शब्द,,,शिल्प,,चिञ ,,,,गीतांचा जागर; ग. दि. मा यांच्या स्मारकासाठी मसाप, साहित्यिक व कलावंतांचे लक्षवेधी जन आंदोलन।

December 14, 202016:19 PM 50 0 0

जालना ( प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी, ग. दि .माडगूळकर यांचे रखडलेले स्मारक पूर्णत्वास जावे याकरीता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जालना शहरात मराठवाडा साहित्य परिषद आणि ग. दि. मा .प्रेमी साहित्यिक, कलावंत, चित्रकार, मुर्तीकार,गीतकार यांनी शब्द ,शिल्प, चित्र, गीतांचा माध्यमातून जागर करून लक्षवेधी जन आंदोलन केले. ग. दि. माडगूळकरांच्या स्मारकार्थ आंदोलनाचे जनक प्रदीप निफाडकर आणि कार्यकारिणी समिती च्या वतीने संपूर्ण जगभरात गदिमा प्रेमींच्या वतीने सोमवारी ( ता. १४) जनआंदोलन आयोजित केले. या आंदोलनात सहभाग म्हणून जालना शहरातील गांधी चमन परिसरात सकाळी आंदोलनाचे जिल्हा समन्वयक अरूण घोडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हा संयोजक तथा मसाप जालना चे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, सचिव पंडितराव लव्हटे (तडेगांवकर) चिञकार मुकूंद दुसे, अशोक जोशी,मधुकर जोशी, शिल्पकार संजय गोधेकर, डॉ. सुहास सदाव्रते,नाट्यांकुर चे प्रकल्प प्रमुख आशीष रसाळ, दिपक रन्नवरे,दिनकर घेवंदे,नेहा दंडे, अजिंक्य दंडे, दिनेश सन्याशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनआंदोलनाचे जिल्हा समन्वयक अरूण घोडे या वेळी म्हणाले की, गदिमा यांची जन्मभूमी, कर्मस्थळ आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथे स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी अनुकूलता दर्शवली. पुणे शहरापासून सहा किमी अंतरावर कुंपण भिंती साठी तीन कोटींचा निधी खर्च झाला. असे सांगून अरूण घोडे म्हणाले, पुण्यातील पूरप्रवण भागातील जागा बदलून गदिमा यांचे नातू श्रीधर माडगूळकर यांच्या उपस्थितीत कोथरूड येथील महात्मा सोसायटी जवळ स्मारक करण्याचे निश्चित झाले. जन्म शताब्दी वर्ष उलटून गेल्यानंतरही स्मारक पुर्णत्वास गेले नाही. अशी खंत व्यक्त करत स्मारक लवकर व्हावे यासाठी जागर जनआंदोलन करण्यात आले. अशी भूमिका अरूण घोडे यांनी स्पष्ट केली. मसापचे सचिव पंडितराव तडेगांवकर यांनी स्मारक उभारणी जनआंदोलनात घोषणा बाजी न करता साहित्यिक, गीतकार, शिल्पकार यांनी कलेतून आपल्या भावना व्यक्त केल्या. असे नमूद केले.
शिल्पकार संजय गोधेकर यांनी गदिमांचे रेखीव व सुबक अशी मुर्ती साकारली. चिञकार मुकूंद दुसे,अशोक जोशी, पियुषा राऊत व विद्यार्थ्यांनी आकर्षक, हुबेहूब प्रतिमा असलेली छायाचित्रे काढली तर नेहा दंडे, अजिंक्य दंडे, चेतना भाले, दिनेश सन्याशी यांच्या चमूने स्वंये श्री राम प्रभू ऐकशी,,,. राम जन्मला गं सखे,, राम… गा बाळांनो गा श्रीरामायण,, स्वंयवर झाले सितेचे.. अशा बहारदार गीतांतून आंदोलनात रंगत आणली. एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.
आंदोलन स्थळी सतारवादक सखाराम बोरूळ, भाजपाचे गटनेते अशोक पांगारकर, नगरसेविका सौ. संध्याताई देठे,डॉ. संभाजी पाटील, डॉ. रामदास वैद्य, संजय देठे,हरिश महाजन, मधुकर सोनवणे, शशिकांत दाभाडकर, रामेश्वर कुरिल, रामदास कुलकर्णी, अहेमद नूर, बाबा खान, प्रशांत तुल्ले, अरविंद देशपांडे, वर्षा चंद, विरेंद्र धोका, गिरीश राखे, किशोर मरकड, एस एस जोशी, विशाखा नाईक, अॅड. ललीत हट्टेकर, गजानन पल्ले, धीरज मेवाडे यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *