ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जागतिक कृषीमहोत्सव 2021 कृषीभूषण आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये जालन्यातील शिवनगर येथे मेळावा संपन्न

January 13, 202112:25 PM 83 0 0

आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) सेवामार्गा च्या वतीने दरवर्षी कृषी महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षी हा महोत्सव 22 ते 28 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. या निमित्ताने जालना येथे शिवनगर केंद्र येथे मेळावा संपन्न झाला.

या मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून कृषीभूषण आबासाहेब मोरे यांची उपस्थीती लाभली होती. मार्गदर्शनातील ठळक मुद्दे बदलत्या वातावरणाचा पिकांवर होणारा परीणाम * *गटशेतीचे फायदे *सेद्रिंय शेती आधूनिक शेती औजारांचा वापर * पारंपारिक बीयाणांचे जतन करणे* सेद्रिंय भाजीपाला उत्पादन विषमुक्त फळ उत्पादन * ए२ दुधाचे फायदे * साध्या पद्धतीने व कमी खर्चात विवाह * व्यसनमुक्ती* पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करणे* बालसंस्कार * आदि विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.व खासदार निधीतून मिळालेल्या सभागृहाचे लोकार्पण सोहळा कृषिरत्न आबासाहेब मोरे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला जालना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती

उपाध्यक्ष भास्कर, आबा दानवे शिवनगर नगर येथील नगरसेवक शशिकांत घुगे प्रल्हाद बिल्हारे झिंजुर्डे सर नरेंद्र देशमुख, राजेंद्र ठाकरे, सुभाष घारे, शीलाताई ढवळे काकू, सावित्रा बिल्हारे , सेवेकरी व शेतकरी बंधू व महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *