ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वडूज शिक्षण विकास मंडळ ,वडूज संचलित म.फुले प्रा.शाळेत जागतिक महिला दिन व विज्ञान दिवस साजरा

March 12, 202213:03 PM 51 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे) : वडूज शिक्षण विकास मंडळ,वडूज संचलित महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळा व प्रेरणा शालेय पूर्व केंद्र वडूज या शाळेत 28 फेब्रुवारी विज्ञान दिन व 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोणा संक्रमण काळात विद्यार्थी शाळेपासून दुरावला होता. शालेय उपक्रम हे विद्यार्थ्याला शाळेची गोडी लावण्यास मदत करतात. याच उद्देशाने महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळेने वैज्ञानिक प्रयोगांचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी स्वतः अतिशय उत्कृष्ट प्रयोगांचे सादरीकरण केले.मोठ्या संख्येने पालक वर्ग विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी उपस्थित झाला होता. यावेळी समिती सदस्य डॉक्टर हेमंत पेठे यांनी चिकित्सकपणे मुलांचे प्रयोग बघून त्यांना मार्गदर्शन केले व कौतुक केले.
महिला सक्षमीकरण या उद्देशाने शाळेत 8 मार्च महिला दिन साजरा करण्यात आला. शाळेचे आवार कर्तुत्ववान भारतीय महिलांच्या विविध वेशभूषानी फुलून गेले होते. बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचे समाजासाठी असलेले योगदान सांगणारी भाषणे, कविता,नाट्यछटा सादर केल्या. राजमाता जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई किरण बेदी,कल्पना चावला,सिंधुताई सपकाळ, लता मंगेशकर अशी अनेक महान व्यक्तीचित्रे विद्यार्थिनींनी साकारली.कार्यक्रमाला पालकांची उपस्थितीही लक्षणीय ठरली.पालकांनी मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापिका शितल शिंदे यांनी त्यांच्या मनोगतातून स्त्री पुरुष समानता या विषयी विचार मांडले. सह. शिक्षिका विजया खराडे अर्चना थोरात, सुवर्णा लोहार,मीनल देशपांडे मदतनीस माया म्हामणे, भारती यादव, दिपाली टाकणे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. अशितोष गवळी यांनी केले. समिती सदस्य डॉक्टर हेमंत पेठे, श्री सतीश शेटे,श्री. नितीन जाधव,श्री गोविंद भंडारे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *