ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गावदेवी महिला म॓डळातर्फ जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

March 13, 202212:12 PM 52 0 0

मुरुड जंजिरा (सौ नैनिता कर्णिक) : मुरुड जंजिरा येथील गावदेवी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन गावदेवी मंदिरात आयोजित करण्यात आला.गावदेवीला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम गावदेवी मंडळ अध्यक्षा वृषाली चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले.तद्नंतर आपल्या मनोगतात महिला दिनाचे महत्व सांगून महिलाची अनेक रूपे असल्याचे प्रतिपादन केले.महिलेने स्वत:साठी वेळ काढणे किती गरजेचे आहे हे उदाहरणाद्वारा स्पष्ट केले.व या मंडळामार्फत मकरसक्रांत हळदीकुंकु व महिला दिन असे कार्यक्रम केले जातात तसेच महिलाच्या वर्गणीतून गरजू महिलांना मदती केली जाते हे नमुद केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून नैनिता कर्णिक मॅडम यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कौतुकास्पद शब्दाने व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. कार्यक्रमात महिलांनी संगीत खुर्ची,अनेक विविध खेळ,अंताक्षरी, गायन अशा विविधतेने मनोरंजनाचा आस्वाद घेतला.जेणेकरून महिलांच्या सुप्तगुणांना वाव मिळेल. नैनिता कर्णिक यांनी आपल्या मनोगतात महिला या शब्दाचा अर्थ सांगून ८ मार्चलाच महिला दिन साजरा करण्यात का येतो या विषयीचे महत्व विशद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्षा प्राजकता चव्हाण देवेश्री राजपूरकर,सचिव छाया अत्रे शैलजा काते यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी अनेक महिला उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन व अल्पोपहार नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *