ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या विषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन

April 7, 202215:26 PM 38 0 0

उरण (तृप्ती भोईर) :  रविवार दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी चांदणी चौक ,करळ फाटा उरण याठिकाणी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी साहेब यांना प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण यांच्या वतीने प्रात्साविक उरण रेल्वे स्टेशन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्या विषयी लेखी निवेदन देण्यात आले यावेळी विद्यमान आमदार महेश बालदीजी , तालुकाध्यक्ष रवि भोईर नवनीत भोईर, सुरज पाटील, कृष्णा जोशी, हेमदास गोवारी , सुनील पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
२०१३ च्या केंद्राच्या भुसंपादन कायद्यान्वये उरण काळाधोंडा येथील स्थानिक भुमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, व भविष्यात रेल्वे स्टेशन कार्यालयात कामगारांची भरती प्रक्रिया होईल त्यामध्ये १०० टक्के भरती ही येथील रेल्वे प्रकल्प बाधित भुमिपुत्रांची करावी, हाऊसकिपिंगच्या कामात रेल्वे प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य असावे, रेल्वे स्थानकातील आवारात असलेली व्यापारी दुकाने, गाळे भाडेतत्वावर सरकारी फी आकारून प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावी तसेच बाधित भुमिपुत्रांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा , सदर या होवू घातलेल्या रेल्वे स्टेशनला “उरण कोट”, हे नाव देण्यात यावे या विविध मागण्या संदर्भात अनेक वेळा आंदोलने, संप, उपोषणे, झाली तरीही या शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही .
आतापर्यंत अनेकदा विविध मार्गांने प्रयत्न करुनही या रेल्वे प्रकल्पाचे प्रश्न प्रलंबित च आहेत आणि आता या प्रश्नांचा पाठपुरावा केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी साहेब यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी उरण तालुक्यातील या कोटनाका -काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. उरण तालुक्यातील या रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिन रेल्वे प्रकल्पासाठी रेल्वे व सिडको प्रशासनाने संयुक्तरीत्या संपादित करण्यात आली पण या बाधित भुमिपुत्रांना त्याच्या बदल्यात आजतागायत कोणतीही नुकसानभरपाई मिळाली नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या संतप्त शेतकऱ्यांनी २७ नोहेंबर २०२० पासून कोटनाका येथे रेल्वे स्टेशन येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली होती अनेकदा संप आंदोलन करूनही पालथ्या घड्यावर पाणीच. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आशा केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी साहेब यांच्या कडून केली जात आहे. या अनुषंगाने माननीय केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांना रेल्वे कृती सेवा संस्था उरण यांच्या वतीने याठिकाणी हे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *