ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण तालुक्यातील दीव्यांग बांधवांचा उरण पंचायत समिती समोर यल्गार

December 12, 202112:15 PM 54 0 0

उरण ( संगिता पवार ) शासनाच्या आदेशानुसार ग्राम पंचायत, पंचायत समिती तर्फे देण्यात येणारा 5% निधी मागील अनेक वर्ष न दिल्यामुळे उरण तालुक्यातील दिव्यांग संघटनेकडून अनेक वेळा निवेदन देवून देखील कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. 03/09/2021 रोजी मान गट विकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मान्य केले की दिव्यांग निधी त्वरित वितरित केला जाईल. परंतु त्याची कोणतीही अंमल बजावणी झाली नाही. जागतिक अपंग दिना दिवशी 03/12/2021 रोजी ग्राम पंचायत,, पंचायत समिती, उरण तहसीलदार यांना शुक्रवार ( दि. १० ) रोजी तीव्र आंदोलन करणार याची नोटीस देण्यात आली. होती परंतु तरीही कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे शुक्रवार ( दि. १० ) रोजी पंचायत समिती उरण येथे दिव्यांग बांधवांनी मोर्चा काढला .

गटविकास अधिकारी निलम गाडे यांनी लेखी स्वरूपात लिहून दिले की, चाणजे ग्रुप ग्रामपंचायती मार्फत दिव्यांग व्यक्ती करिता ५% निधी मागील अनुशेष सहित रक्कम रुपये ८,५३ ,६२० /- खर्च करण्याचा आहे .सदर ची बाब शुक्रवार ( दि. १० ) डिसेंबर रोजी कार्यालया समोर चाणजे चे सरपंच व ग्रामसेवक यांच्या सोबत चर्चा केली आहे .या चर्चे मध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कटाक्षाने पूर्ण करण्याबाबत सरपंच ,व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत चाणजे यांना देण्यांत आल्या आहेत .डिसेंबर महिन्याच्या ३१ डिसेंबर महिन्याच्या तारखेच्या आत निधी देण्यांत येईल .त्याच प्रमाणे सर्व ग्रामपंचायतीचा ५ % मधील दिव्यंत निधीचा खर्च माहे मार्च २०२२अखेर १००% दिला जाईल .
सदर मोर्चाला गट विकास आधिकारी निलम गाडे , उरण पंचायत समिती सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील माजी सभापती सागर कडू उरण ,पंचायत समिती सदस्य हिराजी घरत बेरोजगार अपंग जीवन विकास समाज कल्याण संस्था उरण चे सर्व सदस्य , ,
दिव्यांग संघटना अध्यक्ष योगेश पाटील ,उपाध्यक्ष महेंद्र म्हात्रे ,
सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार ,प्रा. राजेंद्र मढवी ,चाणजे सरपंच मंगेश थळी,, सर्व पंचायत समिती सदस्य ,दिव्यांग बांधव . ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *