नांदेड- स्त्रीशिक्षणाच्या उद्गात्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या वेशात सादर झालेली ‘होय…!मी सावित्री बोलतेय! ही एकपात्री एकांकिका रंगली. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळ्याच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला. शाळा बंद असतांनाही या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार, कमलबाई गच्चे, सरस्वती गवारे, मालनबाई शिखरे, हैदर शेख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींची समयोचित भाषणे झाली. शिक्षक नेते संतोष अंबुलगेकर यांनी सुयोग्य मार्गदर्शन केले. ढवळे जी. एस. यांच्या दिग्दर्शनाखाली इयत्ता पाचवीतील साक्षी गोडबोले, अक्षरा गोडबोले, शुभांगी गोडबोले यांनी एकापाठोपाठ सावित्रीबाई फुले यांच्या वेशात ‘होय..! मी सावित्री बोलतेय! ही एकपात्री एकांकिका सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. इयत्ता सातवी मधील संध्या गच्चे, गंगासागर शिखरे, प्रतिक्षा गोडबोले, अंजली झिंझाडे, दिव्या गच्चे, अंजली कदम यांनी सावित्रीगान हा कार्यक्रम सादर करुन समारोप केला. सूत्रसंचालन संध्या गच्चे हिने केले तर आभार संघरत्न गोडबोले याने मानले.
एकपात्री एकांकिका सादर करण्याच्या नियोजनासाठी गेल्या आठवड्यापासून कावेरी गच्चे, गितांजली गोडबोले, वैभवी शिखरे, कल्याणी शिखरे, कृष्णा शिखरे, योगेश मठपती, रितेश गवारे, अनुष्का झिंझाडे, दीपाली गोडबोले, निशा गोडबोले, अक्षरा शिंदे, लक्ष्मण शिखरे, अक्षरा शिखरे, शादुल शेख, मुस्कान पठाण, रामदास पांचाळ, साक्षी गच्चे, श्रावस्ती गच्चे, कोमल चक्रधर, श्रुती मठपती यांनी पुढाकार घेतला होता.
Leave a Reply