आजच्या या जागतिक स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण तणावाखाली जगत असल्याचे दिसून येते. त्यात कोरोनाच्या या परिस्थितीने मानसिक तणावही प्रत्येकाच्या मनामध्ये वाढलेला आहे. आज प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व पटलेले आहे व प्रत्येक जण आनंदी व निरोगी जीवन जगण्यासाठी प्रयत्नरत असलेला आम्हाला दिसतो.
निरोगी व आनंदि जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे योग होय. केवळ योगासने म्हणजे योग नाही. योगशास्त्र ज्याला आपण आता ‘योग’ किंवा इंग्रजीत त्याला ‘योगा’ म्हणतो. ही खरी आपली प्राचीन भारतीय परंपरा आहे. हिंदू धर्माने किंवा भारतीय संस्कृतीने दिलेली ही एक समृद्ध जीवनपद्धती आहे. कोणत्याही धर्म, उपासना व पंथाची व्यक्तीे योग करू शकते. म्हणूनच जगातील लक्षावधी जिज्ञासू योगाकडे वळताना दिसतात. योगशस्त्रानुसार जीवनपद्धती केवळ आध्यात्मिकच नव्हे तर भौतिक जीवनातही यशस्वी करते. वेळेचे महत्त्व ओळखून जीवन जगणे हे योगच आहे. आजची जागतिक परिस्थिति बघता असे वाटते की योगशस्त्र हे आपल्या जीवनशैलीचा भाग बनविण्याची हीच ती वेळ आहे. योगशास्त्र मानसिक स्थैर्य देते जे आज शारीरिक स्वास्थ्यासाठीअत्यवश्यक आहे. योग म्हणजे बहिरंगातुन अंतरंगात जाण्याचा प्रवास आहे. या योगसाधनेतूनच शरीर व मन हे शुद्ध, सुदृढ व संतुलित होतं. ही निरंतर व दीर्घकाल चालणारी साधना आहे. योगासनांचा विचार केल्यास शरीर व मनास सुदृढता, लवचिकता व बळकटी प्राप्त करून देण्याचं काम योगासनं करतात. शरीर व मनावर चांगले संस्कार हे योगाभ्यासाच्या निरंतर सरावातून होतात. योगात अष्टांग मार्ग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, द्यारणा नि समाद्यी याला प्राद्यान्य दिले गेले आहे. योगशास्त्रानुसार मानसिक स्वास्थ्य व सोबत जीवनात उठण्याबसण्याचे व खाण्यापिण्याचे नियम घालून घ्यावे लागतात. अन्यथा एकांगी स्वरूपाचे कार्य वा विचार होईल. गीतेत म्हटले आहे ”योगावरी चढू जाता शम साद्यन बोलिले” शमचा अर्थ संयम.”न फार खावूनि किंवा खाणेचि सोडूनि, निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्यही मोजूनि करितो त्यास योग हा दु: ख नाशन.” अर्जुनाला दिलेला उपदेश सर्वांसाठी योगप्रेरक आहे. आज विश्वकल्याणासाठी हिन्दु संस्कृतीने दिलेल्या व युगानुयुगे टिकवुन ठेवलेल्या योगशास्त्रचा अभ्यास करून त्याचा जगभर प्रसार करणे आवश्यक आहे.
डॉ० पी. एस. महाजन
संभाजीनगर
Leave a Reply