जालना – युवावर्गाने एचआयव्ही/ एड्सबाबत जास्तीत जास्त संवेदनशील राहुन कसे सुरक्षित राहता येईल. तसेच महिन्याभरामध्ये जास्तीत जास्त गर्भवती महिलांची, अतिजोखीम गटाची स्थलांतरीत कामगारांची एचआयव्ही तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, जालना येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. भोसले बोलत होत्या.
कार्यक्रमास सचिव विधी सेवा प्राधिकरणचे आर बी पारवेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, कोव्हिड विभाग प्रमुख डॉ प्रतापराव घोडके, प्रशासकीय अधिकारी डॉ संतोष जायभाये, जिलहा कार्यक्रम अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा मुल्यमापन व सनियंत्रण अधकारी श्रीमती सोना सुर्यवंशी, श्रीमती तनुजा पाटील, समुपदेशक श्रीमती प्राजक्ता जोशी, प्रकल्प व्यवस्थापक श्री शेख शकिल अशासकीय संस्था आदीची उपस्थिती होती.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्यजा सराफ यांची उपस्थिती होती .
यावेळी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आर बी पारवेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Leave a Reply