ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युवकांनो! वसुंधरेला सांभाळा

June 4, 202114:43 PM 73 0 0

आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा करीत आहोत. विश्व म्हणजे वसुंधरा. पर्यावरण,वसुंधरा आणि मानव यांचा अतिशय जवळचा सहसंबंध आहे. ते एकमेकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

वसुंधरेचं घनदाट निसर्ग सौंदर्य पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणाचा
समतोल टिकविणे हे मानव जातीवर अवलंबून आहे. म्हणजेच ह्या तिघांनाही एकमेकांपासून दुर करता येणार नाही. वसुंधरेचे आरोग्यमय जीवन हे सुंदर नटलेल्या निसर्गमय प्रफुल्लित पर्यावरणामुळे अगोदर पासूनच लाभलेले आहे. जणू वसुंधरा ही नववधू सारखी नटूनथटून हिरव्यागार घनदाट अरण्यरुपी मंडपात उभी आहे. तरीही मानव प्राणी तिच्या मध्ये भौतिक सौंदर्याची भर तिच्या मूळ सौंदर्यात ओतण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि ह्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडविला घडविला जात आहे. आणि ही वसुंधरा विविध आपत्तीजनक संकटात अडकून सापडलेली आहे.

विकास नावाखाली वाढती औद्योगिक क्षेत्रे, महामार्गाचे वाढते जाळे,विराट शहरांचे वाढते अक्राळ विक्राळ रूप, त्यांना तयार होताना लागणारे विटा आणि वाळू. वीट भट्टी यांचा विषारी धूर वाळूचा उपसा त्यामुळे पाण्याच्या प्रमाणात होणारी घट, त्यामुळे जमिनीची वाढणारी धूप. त्यातून निर्माण झालेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पाण्यासाठी खोदल्या जाणाऱ्या विंधन विहिरी, महामार्ग तयार करण्यासाठी लक्षावधी वृक्षांची होणारी कत्तल, कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारे विषारी धूर, विषारी वायू, समुद्रात सोडण्यात येणारे विषारी घटक या अनेक कारणांनी तयार होणारे प्रदूषण आणि त्या प्रदूषणाचा होणारा परिणाम वसुंधरेवर होतो. आणि तिच्या सौंदर्याचा -हास होतो. आणि हा -हास म्हणजे मानवी जीवनाला रोगाचे आमंत्रण होय.

कारण जंगलाला वणवा लागणे, तापमानात वाढ होणे, पावसाची अनियमितता होणे, ज्वालामुखीचा उद्रेक, लाव्हारस बाहेर पडणे ,भूकंप, ओझोन पट्ट्याची पातळी कमी होणे. महापुराचे संकट, चक्रीवादळ, याप्रकारच्या महाआपत्तींतून फार मोठ्या परीणामाला तोंड द्यावे लागते.
नुकतेच भारताच्या पश्चिम किनारपट्टी तोक्ते वादळाच्या तडाख्यातून सावरली न सावरलीच तर पूर्व किनारपट्टीवर व्यास नावाच्या वादळाने धुमाकूळ घातला. कांन्गो देशात ज्वालामुखीचा उद्रेक झाला. याबरोबरच कोरडा दुष्काळ, हिमस्लखन, भूस्खलन अशा नैसर्गिक दुर्घटना मध्ये लक्षणीय वाढ झालेली आपण पाहत आहोत. याचे कारण सांगायचे झाले, तर ते फक्त आणि फक्त म्हणजे पर्यावरणाचा असमतोलपणा होय.आणि त्याला कारणीभूत कोण असेल तर आजचा तंत्रज्ञान युगात वावरणारा विकासाच्या नावाखाली वसुंधरेच्या सौंदर्यात सिमेंट रुपी प्रसाधनांची भर टाकणारा एकमेव मानव नावाचा प्राणी होय. यामुळेच तापमानात वाढ होवून पर्यावरणाचा असमतोल पणा वाढतो आहे.
या असमतोल पणाचे खरे कारण प्रदूषण होय.आणि प्रदूषण म्हणजे रोगांचे माहेर घर होय.
एवढेच नाही तर प्रदूषणातून निर्माण होणाऱ्या असंख्य रोगांचे बळी फक्त माणूसच नाही तर पशू, पक्षी हेही यातून सुटलेले नाहीत. आज आपण ज्या संकटाला तोंड देत आहोत, त्या महामारी चा संबंध कुठेतरी पर्यावरणाची मिळतोच हे नाकारता येणार नाही.

एखाद्या रोगावर प्रयोग शाळेत औषधे किंवा लस तयार करता येईल.पण एखाद्या आपत्तीवर औषधे नाहीत. हेही तेवढेच खरे.

मग या संकटातून आपल्याला वाचवणार कोण? याची जबाबदारी कोण स्विकारील?

याचे एकच उत्तर समोर येईल आणि ते म्हणजे मानुस. हाच वसुंधरेचा विकास घडवून आणू शकतो किंवा हलगर्जीपणा केला तर प्रदूषण वाढवतो.तो घडवतो ही आणि बिघडवतो. तसा माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. कारण त्याच्या बुद्धीने सारे जग मुठीत घेतले आहे. म्हणून त्याने जर कोणती गोष्ट मनावर घेतली तर त्यातून नक्कीच त्याला यश मिळविता येते यात शंका नाही.

बिल गेट्स एका पुस्तकात सांगतात की, आपण शून्य टक्के कार्बन उत्सर्जन साध्य करण्यात यशस्वी झालो, तर ते मानवतेचे इतिहासातील सर्वात मोठे संशोधन असेल. म्हणून यावरून पूरक जीवनशैली आणि हरित उत्पादनांना प्राधान्य देणे हीच एकमेव गरज आहे.

यासाठी युवकांनी समोर येणे गरजेचे आहे. आणि हरितक्रांतीचे महत्त्व समाजामध्ये पटवून देणे त्यांची जबाबदारी आहे. कारण आम्ही भूतकाळात जर डोकावलो तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये वृक्षांना लेकरासम सांभाळले. शेतात आंबा, चींच,कडुलिंब, जांभळ,बोर अशी फळांची अनेक वृक्ष लावलेली होती. जंगला मध्ये सुद्धा विविध उपयुक्त तसेंच औषधीयुक्त अशा घनदाट वृक्षांनी वनराई फुललेली होती. पण मानसाने आपल्या हव्यासापोटी अरण्य हरण करून टाकलेली आहे. पण असो पुन्हा ती आपल्यालाच उभी करावयाची आहे.

म्हणून युवकाने हिरव्यागार घनदाट वनराई बद्दलचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या उपक्रमातून वृक्षारोपणाचा हा संकल्प गावपातळीवर,शाळा, मित्रसमुह आणि कुटुंब मध्ये सुद्धा राबवावा. ‘मियावाकी’ ही वृक्ष लागवडीचा जपानी पध्दतीचा कार्यक्रम त्यांना समजावून द्यावा. ही प्रत्येकाची जबाबदारी बनावी. तरच आपण यशस्वी होवू.

आपले कार्य हे मनोभावे आणि निस्वार्थी असावे. कारण वर्तमानपत्रातून आपण नेहमीच वृक्षारोपणाच्या बातम्या वाचतो. त्यात लक्षावधी वृक्षांची नोंदीही केलेल्या असतात. पण वर्षाअखेर किती जोपासली जातात?त्यापैकी अस्तित्वात किती आहेत.? ह्या नोंदी वाचायला मिळत नाहीत.

म्हणून युवकांनो! ही वसुंधरा तुम्ही सांभाळा. तुम्ही जिद्दी असता,तुमच्या मध्ये नवी उमेद असते. तुम्ही निस्वार्थपणे कार्य करु शकता. पर्यावरणाचा समतोल राखू शकता..परीवर्तन घडविण्याची ताकद फक्त तुमच्या मध्येच आहे.

‘चला सारे संकल्प करु
आपण पर्यावरण सुधारु’

– बाबुराव पाईकराव
सहशिक्षक,डोंगरकडा.
मो. 9665711514.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *