ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सर्वच समाजातील तरुणांनी लसीबाबत जनजागृती करावी – धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो

May 10, 202114:17 PM 34 0 0

नांदेड – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणावर मानवी जीवन उद्ध्वस्त करून टाकले आहे. मास्क, सॅनिटाईझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करतांनाच लसीकरण होणेही आवश्यक आहे. याबाबत बौद्ध तरुणांनी पुढाकार घ्यावा तसेच इतर समाजातील तरुणांनीही जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी सोशल मीडियातून केले आहे. आजच्या परिस्थितीत कोवीड परिस्थितीमुळे सर्व धार्मिक कार्यक्रम बंद आहेत, सामाजिक कार्यक्रम अत्यंत छोट्या स्वरूपात पुर्ण करायचे आहेत. आपल्या घरातील लग्नविधी पूर्ण करून घेण्यासाठी सुद्धा त्या कार्यक्रमात उपस्थित लोकांची संख्या मर्यादीत करण्यात आली आहे. या परिस्थितीत कोवीडसारख्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी त्यावरील उपाययोजना पुर्णपणे अंमलात आणणे आवश्यक आहे.

ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसाचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे कोव्हिड लस घेतली. त्यानंतर सोशल मीडियातून त्यांनी सर्व जनतेनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट जाते न जाते तोच तिसरी लाट येणार असल्याचे खुद्द आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वांनी शक्य होईल त्या पद्धतीने लवकरात लवकर आपले लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. लसीबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, ते दूर झाले पाहिजेत. यासाठी सर्व समाजातील युवा- युवतींनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले.

शनिवारी दि. ८ मे रोजी भदंत पंय्याबोधीजी यांनी शासकीय रूग्णालयात आपल्या स्वत:वर लसीकरण करून घेतले. आजच्या कोवीड परिस्थितीमध्ये कोवीडला हरविण्यासाठी कोवीड लस घेणे क्रमप्राप्त आहे. मी आज लसीकरण करून घेतले आहे. त्यातून मला कोणतीही समस्या जाणवली नाही. काही समस्या जाणवली तरी वैद्यकीय मंडळी त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आपल्यासाठी कायम तयार आहेत. तेव्हा जनतेतील सर्वांनी कोव्हिड लसीकरण करून घ्यावे आणि कोवीडमुळे तयार झालेल्या त्या भितीला हरविण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे मत भदंत पंय्याबोधीजी यांनी व्यक्त केले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *