ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणमध्ये युवा महोत्सवाचा जल्लोष

January 4, 202213:32 PM 20 0 0

उरण( संगिता पवार ) :  उरण उरणकरांसाठी सिडकोकडून मैदानाच्या जागेसाठी संबंधित ‘विभागाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक बोलावून मैदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी उरण येथील आयोजित करण्यात आलेल्या २१व्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या युवा महोत्सवाचे रविवारी उद्घाटनप्रसंगी दिले.

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजित करण्यात येते. या वर्षीही २ ते १६ जानेवारी असे सलग पाच दिवस २१व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बोकडवीरा येथील नवी मुंबई सेझ मैदानावर रविवारपासून सुरू झालेल्या या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी १३२ हून अधिक प्रकारातील विविध स्पर्धाचा महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. या शानदार सोहळ्याचे उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रविवारी झाले.

उरणकर द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून मागील २१ वर्षापासून मैदानाची मागणी करत आहेत. मात्र, दरवर्षी त्यांच्या हाती आश्वासनाखेरीज काहीच लागले नाही. हाच धागा पकडून पालकमंत्री अदिती तटकरे यांनी उरणकरांसाठी सिडकोकडून मैदानाच्या जागेसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक बोलावून मैदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, उपाध्यक्ष मनोज पडते आदी पदाधिकारी, खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *