ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धम्म चळवळ गतिमान करण्याकरिता युवक-युवतींचा सहभाग असणे काळाची गरज : गायक क्रांतीकुमार पंडित

November 2, 202112:40 PM 82 0 0

नांदेड – अखिल विश्वाला न्याय समता बंधुभावाची शिकवण देणाऱ्या बुद्धधम्माच्या प्रचार प्रसारात युवक युवतींचा सहभाग असणे काळाची गरज आहे असे मत सुप्रसिद्ध गायक क्रांतीकुमार पंडित यांनी व्यक्त केले. यावेळी भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत शीलरत्न व त्यांचा भिक्खू संघ, महापौर जयश्रीताई पावडे, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. डी. यू.गवई , उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. भास्कर दवणे , प्रफुल्लदादा सावंत, नगरसेवक महेंद्र पिंपळे, फारुख अली,अपर्णाताई नेरलकर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अॅड. यशवंत चावरे, लाॅर्ड बुद्धाचे सदाशिव गच्चे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे, साहेबराव पुंडगे, हिरामण वाघमारे, कवी उमेश बऱ्हाटे, डॉ. रमेश कसबे, डी.डी. भालेराव प्रकाश गवारे, अनिल थोरात, धम्मसेवक बी. के. कदम आदी उपस्थित होते.

शहरातील सहयोग नगरच्या बुद्ध विहारात गायक क्रांती कुमार पंडित प्रस्तुत ऑर्केस्ट्रा क्रांतीसुर्य यांचा बुद्ध भीम गीतांचा संस्कृती कार्यक्रम संपन्न झाला. यात गायक क्रांतीकुमार पंडित, गायक सुनील हटकर, गायक रामभाऊ मस्के, गायिका शितल टिपरे, संगीतकार नागेश, संगीतकार प्रेमकुमार सरकटे संगीतकार आकाश गायकवाड आदींनी सहभाग घेतला. “हा धम्म हो नवा नवा दुःखा वरील ही दवा “, “खूप शिकावं जीवाला जपा बोले भीमाला रमा”, “वादळाचा वार हो पावसाची धार हो फोड बांध बांधाच्या पार हो”, “वादळी वाऱ्यामधी तोफेच्या माऱ्यामधी पाहिला भिम आम्ही रणी लढणाऱ्यामधी”अशा अनेक क्रांतिकारी परिवर्तनवादी गीतांनी श्रोते मंत्र मुग्ध झाले. या कार्यक्रमासाठी माता रमाई आंबेडकर महिला मंडळ भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा सह्योग नगर पीर बुरहान नगर नांदेड आणि राजेशदादा बिऱ्हाडे, रमेश कोकरे, साहेबराव गायकवाड, हंसराज काटकांबळे, प्रसेनजित मांजरमकर तथा सर्व युवक मंडळ सह्योग नगर नांदेड या सर्वांनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *