सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी :अर्चना गडाळे) : कुडाळ दि,27सप्टेंबर2021 युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगावे यांच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
सन2020साठी आनंद मानाजी तांबे (जि, प शाळा-ओटव नांदगाव)व सन2021 साठी श्रीमती वंदना नारायण राणे( जि प शाळा कणकवली २) यांची निवड झाली आहे बुधवार दि,29 सप्टेंबर 2021 रोजी मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे होणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च बक्षीस वितरण कार्यक्रमात मुख्यकार्यकारी अधीकारी सिंधुदुर्ग यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात येणार आहे
Leave a Reply