ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी जालन्यात युवा सेनेच्या वतीने रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळला

March 4, 202212:32 PM 43 0 0

जालना (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी युवा सेनेच्या वतीने आज दि. 03 फेबु्रवारी गुरूवार रोजी युवा सेना विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या नेतृत्वात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळून निषेध करत रावसाहेब दानवेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलतांना युवा सेना विस्तारक अभिमन्यू खोतकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. महाराज या भाजपवाल्यांना मतदानाच्या वेळीच आठवतात त्यामुळे दानवेंची मस्ती उतरविल्याशिवाय शांत बसणार असल्याचे खोतकर यांनी सांगीतले. याप्रसंगी शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख जफर खान यांनी देखील रावसाहेब दानवे यांचा निषेध केला.
यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक अंकुश पाचफुले, शिवसेना अल्पसंख्यांक उप जिल्हा प्रमुख शेख नजीर, दिनेश भगत, दुर्गेश कठोटीवाले, योगेश रत्नपारखे, शेख फेरोज, सद्दाम चाऊस, राजेख कुरेशी, मुसा परसुवाले, बाबा कुरेशी, संतोष परळकर, भोला कांबळे, नरेश खुदभय्ये, खन कनसे, सुशील भाउसार, आदित्य खंडागळे, दत्ता पवार, देवेंद्र बुंदूले, बाळु भिसे, निलेश शिंदे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *