ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जि.प. व प.स वर भाजपाची स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे : संतोष पाटील दानवे

September 26, 202113:15 PM 73 0 0

जालना (प्रतिनिधी):- भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येवून काम केल्यास विकास साध्य करता येईल यासाठी ग्रामीण तरुणांनी संघटीत होवून जि.प. व प.स. वर भाजपाची स्वळावर सत्ता स्थापन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बाजीउम्रद,बाजीउम्रद तांडा, पारेगांव तांडा,मानेगांव खालसा,मानेगांव जहागिर,गणेशपुर,धांडेगांव तांडा,इंद्रानगर(साळेगांव),साळेगांव तांडा येथे भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चा, एस.सी.मोर्चा, ओबीसी मोर्चा शाखा उदघाटन प्रसंगी केले. जालना विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चा,ओबीसी मोर्चा,एस.सी.मोर्चा चे शाखाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे होते तर प्रमुख उपस्थीती म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे,बद्रीनाथ पठाडे,जिल्हा संघटन सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर,भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग पोहेकर, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष परसराम तळेकर, प.स.सदस्य कैलास उबाळे, जिल्हा चिटणीस डॉ.तुकाराम कळकुंबे,स्वीय सहाय्यक गोवर्धन कोल्हे, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल सरकटे,उदयोग सेल तालुकाध्यक्ष शरद सोनुने, संजय आटोळे ,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुनिता जाधव,चिटणीस विष्णु राठोड,रामजी शेजुळ,भटके विमुक्त आघाडी सेल तालुकाध्यक्ष तुकाराम राठोड,सांस्कृतिक सेल तालुकाध्यक्ष सुखदेव (महाराज) गोरे, अपंग सेल तालुकाध्यक्ष लक्ष्मण राठोड,नामदेव नागवे,भागवत जाधव,संतोष डुकरे आदीची प्रमुख उपस्थीती होती. आज दि.25 सप्टेंबर 2021 रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.


यावेळी शाखा उदघाटन प्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष आ.दानवे म्हणाले की, भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱी व कार्यकर्त्यांनी गावाच्या विकासासाठी सर्व सामान्य जनतेचे समाज उपयोगी कामे करावे. भाजपा म्हणजे चालता बोलता जनसेवेचे केंद्र असून ज्या अपेक्षाने आपण भाजपाची शाखा उघडली त्या अपेक्षाची उपेक्षा होणार नाही तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला काय मिळेल काय नाही याचा विचार न करता काम करा ‍निश्चीत त्याचा फायदा भविष्यात भाजपा पदाधिकाऱ्यांना होईल याची मी ग्वाही देत असल्याचे आ.दानवे यांनी सांगितले. गावातील लोक व मतदार हे गाव संभाळणारा व गावातील जनतेची कामे करणारा कार्यकर्ता चांगला असेल व जनतेची कामे करणारा असेल तर मतदार हे त्या पक्षाच्या नेत्याला व उमेदवाराला मतदान करतात त्यासाठी ग्रामीण तरुणांनी गावातील जनतेशी सलोख्याचे संबध ठेवणे जरुरीचे आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार व केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून केंद्र सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान सन्मान योजना राबवून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य केल्यास ग्रामीण भागातील दळणवळणाला गती येवून विकास साध्य करण्यासाठी मोठी मदत बुलेट ट्रेन मुळे होवू शकते दळवळणाचे साधणे मोठया प्रमाणात वाढल्यास विकास कामाना चालना मिळू शकते.
आजरोजी ग्रामीण भागातील शेतकरी व तरुणवर्ग हा गेल्या दोन वर्षापासून कोरोनासारख्या महामारी मुळे आर्थिक संकटात आहे. अतीवृष्टीमुळे व जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीपाचे पिके सोयाबीन, कपाशी, तुर व फळबागा ची नासधुस होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यशासनाने सरसकट ग्रामीण भागात हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करावी व शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवून दिलासा देण्याचे आवाहन राज्यशासनाकडे केले. आज रोजी बाजीउम्रद तांडा,पारेगांव तांडा,साळेगांव तांडा अशा ठिकाणी भाजपाने शाखा स्थापन केली आहे. यापुर्वीही बंजारा समाजाने लोकसभा निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री ना.दानवे साहेबांना भरभरुन मदत केली आहे. त्यामुळे भाजपा हा बंजारा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगून बंजारा समाजाच्या तांडा वस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे आ.दानवे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या नियोजनामुळे देशामध्ये 90 कोटी लोकांना कोरोना लसीकरण लस देशात मोफत देण्यात आली आहे. संपुर्ण देशामध्ये मोफत लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या दिड वर्षापासून कोणतेही शेतकऱ्यांना अनुदान न देता पिक विमा न देता फक्त झुलवत ठेवले आहे. भाजपा सरकारच्या काळामध्ये 2015 ते 18 या वर्षात शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात दुष्काळी मदत अतीवृष्टीमुळे झालेली मदत व पिक विमा देण्यात आला होता परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कोणतेही मदत न देता आर्थीक संकटात लोटले आहे. राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला कंटाळी असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील जनतेचे कामे करण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.दानवे यांनी केले.
यावेळी बठाणचे सरपंच ज्ञानेश्वर देव्हडे,उपसरपंच सचीन बागल,कडवंची सरपंच पांडूरंग क्षीरसागर,गवळी पोखरी सरपंच गणेश वाघमारे,बाजीउम्रद सरपंच संजय राठोड,उपसरपंच विष्णु राठोड,पांडूरंग आहेरकर,सुधाकर लाखे,नारायण जाधव,दत्ता जाधव, छबु राठोड,सुभाष भुतेकर, पुंजाराम भुतेकर,दौलत भुतेकर,ज्ञानेश्वर पडूळ,बंडू तौर,नारायण मोहिते, हरीभाऊ गोरे,अर्जुन मोहिते,शंकर काळे,सोनाजी खडेकर,कृष्णा गायके,विकास कदम,बाबुलाल चव्हाण,योगेश शिमगे, राजेश कुरलिये, विष्णु गुळवे यावेळी बाजीउम्रद शाखा अध्यक्ष दिपक पडूळ,उपाध्यक्ष भानुदास इंगळे, सचिव अर्जुन डोंगरे, सहसचिव विष्णु डोंगरे, शिवाजी डोंगरे, अप्पासाहेब डोंगरे,बाजीउम्रद तांडा शाखा अध्यक्ष शिवाजी राठोड, उपाध्यक्ष त्रिंमक पवार, सचिव रामेश्वर राठोड,सहसचिव सखाराम पवार,सचिन चव्हाण अचीत राठोड,पारेगांव तांडा शाखा अध्यक्ष गोरख जाधव, उपाध्यक्ष रमेश पवार, सचिव नितीन पवार,सहसचिव राम राठोड, अर्जुन पवार,रामेश्वर चव्हाण,मानेगांव खालसा ओबीसी मोर्चा शाखा अध्यक्ष अविनाश गव्हाळे, उपाध्यक्ष पवन सोनुने, सचिव योगेश वाढेकर,सहसचिव भाऊराव गायकवाड, कैलास गायकवाड, विठ्ठल पितळे, मानेगांव जहागिर एस.सी.मोर्चा शाखा अध्यक्ष सुधाकर लाखे, उपाध्यक्ष रामदास लाखे, सचिव प्रकाश लाखे,सहसचिव संतोष लाखे,विलास लाखे,गणेश लाखे, मानेगांव जहागिर महिला एस.सी.मोर्चा शाखा अध्यक्ष मंगलाबाई बोरकर, उपाध्यक्ष उज्वला लाखे, राधा लाखे,सहसचिव सागरबाई लाखे,मिना लाखे, मनिषा लाखे, मानेगांव जहागिर युवा मोर्चा शाखा अध्यक्ष सुनिल पोटरे, उपाध्यक्ष किसन थावरे, सचिव शाम भोकरे,सहसचिव संदीप पोटरे, हरीनारायण वैष्णव, कैलास ढेंगळे, गणेशपुर शाखा अध्यक्ष बाबासाहेब शेळके, उपाध्यक्ष पांडूरंग जाधव, सचिव शिवाजी अचलंखाब,सहसचिव शेख अलीम शेख करीम, गणेश पितळे, गजानन पितळे, गणेशपुर महिला मोर्चा शाखा अध्यक्ष पार्वती जाधव, उपाध्यक्ष परवीन शेख, सचिव संगीता जाधव,सहसचिव दुर्गा धोंगडे, मीना लाखे,रेणुका कळकुंबे, धांडेगांव तांडा युवा मोर्चा शाखा अध्यक्ष मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश आढे, सचिव सचिन राठोड,ज्ञानेश्वर राठोड, भाऊसाहेब चव्हाण, इंद्रानगर (साळेगांव) युवा मोर्चा शाखा अध्यक्ष अनिल राठोड, उपाध्यक्ष राजु कोळे, सचिव भाऊसाहेब राठोड,सहसचिव राहुल आढे, उमेश चव्हाण, अमोल राठोड, साळेगांव तांडा युवा मोर्चा शाखा अध्यक्ष पवन चव्हाण, उपाध्यक्ष सचिन आढे, सचिव प्रदीप चव्हाण,सहसचिव विक्रम चव्हाण, रामेश्वर राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *