जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी केंद्र पाचनवडगाव तालुका जालना येथील शाळेत 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. गावातील ज्येष्ठ शिक्षणप्रेमी नागरिक आणि माजी ग्रामपंचायत सदस्य भीमराव आबा काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षणप्रेमी नागरिक आणि तरुण मित्र मंडळ ध्वजारोहणासाठी उपस्थित होते.
यावेळी नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर तसेच मुख्याध्यापक श्री अनंत शिलवंत यांनी पाचनवडगाव केंद्राचा प्रभारी केंद्र म्हणून पदभार घेतल्याबद्दल गावातील तरुण मित्र मंडळ यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
दिनांक 27 जानेवारी 2021पासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असल्यामुळे उपस्थित पालक आणि विद्यार्थी गावकरी यांना याबाबत covid-19 पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गोवर्धन काळे, सदस्य ज्ञानेश्वर नरवडे, विकास काळे, विकास नरवडे, रमेश काळे, संदीप काळे, दामू अण्णा काळे, कैलास काळे, गणेश बापू काळे, लक्ष्मण काळे, सिद्धार्थ नरवडे, दत्ता काळे, मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री अनंत शिलवंत , ज्ञानेश्वर गिराम (प्रा प), श्रीमती विश्वलता गायकवाड (स.शि.) श्री चक्रधर बागल (स शि) श्रीमती डी. डी. उंचेकर, श्रीमती जे. व्ही.भुंबे हे उपस्थित होते.
Leave a Reply