ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायगांव च्या शिरपेचात मानाचा तुरा

September 28, 202115:23 PM 9 0 0

जालना (अनिता पवार) :  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायगांव येथील विद्यार्थीनी कु. प्रांजली रविकुमार बोचरे हिची जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश निवड झाली आहे. तिला मुख्याध्यापक विजय वाघ, वर्गशिक्षिका कल्पना साखरे, सहशिक्षक संतोष लिंगायत यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रांजली बदनापूर पंचायत समितीचे उपसभापती रविकुमार बोचरे यांची कन्या आहे. रविकुमार बोचरे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेवर विश्वास ठेवत तिचा प्रवेश इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळेत केला. शिक्षकांचे मार्गदर्शन व तिचे अभ्यासातील सातत्य या बाबींमुळे तिने हे यश अगदी सहज मिळविले.
तिच्या यशाबद्दल, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ साहेब, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी मंगल धुपे, बदनापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार, शिक्षण विस्तार अधिकारी जनबंधु, दत्तात्रय क्षिरसागर, केंद्रप्रमुख अण्णासाहेब खिल्लारे, केंद्रीय मुख्याध्यापक आर. आर. जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बखळे, विकास पोथरे यांनी यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *