
जिल्हा परिषद शाळा भेंडखळ, शाळेत घरचा वैद्य व आनंदवन कार्यक्रम साजरा
July 24, 202115:06 PM 70
0 0 रायगड प्रतिंनिधी (अश्विनी धोत्रे) : आज आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा भेंडखळ, शाळेत घरचा वैद्य व आनंदवन कार्यक्रम साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला मान. प्रियांका म्हात्रे मॅडम वरिष्ठ विस्ताराधिकारी प.स. कार्यालय उरण या हजर होत्या. त्यांना आमच्या गावचे उपसरपंच मान. लक्ष्मण ठाकूर माजी विद्यार्थी शाळा भेंडखळ यांनी एक रोपटे देवून स्वागत केल. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी यांनी पण शाळेतील सर्व शिक्षकांना रोपटी दिली.
वृक्ष लागवटीची सूरूवात मान.म्हात्रे मॅडम यांनी पिंपळाचे रोपटे लावून केली. कारण पिंपळ हा एकमेव झाड आहे की तो 24 तास अॉक्सिजन देत असतो.
अशा प्रकारे घरचा वैद्यु व आनंदवन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ,मुख्याध्यापक श्री गणेश पाटील सर,श्रीम. शारदा म्हात्रे मॅडम,श्री अंकुश पाटील सर,श्री विकास पाटील व माजी विद्यार्थी हजर होते.
Categories: महाराष्ट्र
Leave a Reply