ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हा परिषदेच्या शाळांनी नवोदय प्रवेश परीक्षेत गुणवत्ता सिद्ध केली – सूर्यकांत कडेलवार

September 30, 202115:33 PM 22 0 0

सायगांव / जालना दि.२९ (अनिता पवार) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करून दिले व जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सिद्ध केली असे प्रतिपादन बदनापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार यांनी सायगांव शाळेतील प्रांजली रविकुमार बोचरे हिच्या सत्कार प्रसंगी केले. सायगांव शाळेतील विविध उपक्रमांचे व शिक्षकांचे यावेळी त्यांनी कौतुक व अभिनंदन केले. निमित्त होते सायगांव शाळेची विद्यार्थीनी प्रांजली रविकुमार बोचरे हिने जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा उत्तीर्ण केली, त्या निमित्ताने शाळेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला या प्रसंगी ते बोलत होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत कडेलवार, गटशिक्षणाधिकारी, बदनापूर तर प्रमुख अतिथी म्हणून सुचित कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी, बदनापूर पंचायत समितीचे उपसभापती रविकुमार बोचरे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप जनबंधु, केंद्रप्रमुख अण्णासाहेब खिल्लारे, सरपंच प्रमोद शिंदे, पोलिस पाटील शत्रुघ्न बरांडे, भाऊसाहेब बखळे होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रांजलीचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. तिने आपल्या मनोगतात शाळेने घेतलेल्या परिश्रमामुळेच आपल्याला यश मिळाले व शाळेतील विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करून यश मिळवावे अशा शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी तिच्या निवडीबद्दल तिचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


प्रांजली चे वडील रविकुमार बोचरे बदनापूर पंचायत समितीचे उपसभापती असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्तेवर विश्वास ठेवून प्रांजली ला जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश दिला. वर्गशिक्षिका कल्पना साखरे, मुख्याध्यापक विजय वाघ व सहशिक्षक संतोष लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांजली ने हे यश मिळविले.
याप्रसंगी जयहरी शिंदे, भगवान दसपुते, सिकंदर शेख, दीपक शिंदे,प्रमोद बोचरे, पवन बोचरे, कृष्णा बखळे, उमेश बखळे,अमोल शिंदे, हरिभाऊ धनकुरे, सुरेश बखळे, राम लगामे, नवनाथ शिरसाट आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *