महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले. या वृत्तपत्राचा दर्जा पाहता वृत्तपत्राची मागणी वाढली. वृत्तपत्राची मागणी जास्त असल्याने व प्रत्येकापर्यंत पोहचणे शक्य नसल्याने त्यावर मार्ग काढून वाचकांना रोज आणि ताज्या घडामोडीची माहिती मिळावी यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी चे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. या ऑनलाईन सुविधेमुळे वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून शासकीय आणि निमशासकीय योजनांची माहिती, जनहितार्थ माहिती, जिल्हा, राज्य, देश आणि जगभरात सुरु असलेल्या ताज्या घडामोडीची माहिती तसेच महत्वाच्या बातम्या आम्ही वाचकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासोबतच लेख, कथा, कविता, प्रवास वर्णन, आत्मकथा, यशोगाथा, यासह महत्वाचे आणि लोकोपयोगी माहिती रोज वाचकापर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.