जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय, राजकीय नेत्यांबरोबर आता शासकीय कर्मचार्यांनी देखील आकलेचे तारे तोडायला सुरुवात केलीय. बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पेशाने शिक्षीका असलेल्या चित्रा वसंतराव सारणीकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलंय. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्या खावून अभ्यास केल्याचं उदाहरण दिलंय. त्यामुळे आता गदारोळ निर्माण झाला असून या शिक्षीकेला बडतर्फ करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आलीय.सदरील शिक्षीका यां दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिनानिमित्त सेलगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या. चित्रा वसंतराव सारणीकर असं त्या शिक्षीकेचे नाव असून त्यांनी विद्याथ्यार्र्ना मार्गदर्शन करतांना खोटी आणि दिशाभुल करणारी माहिती उदाहरणासह देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिक्षीकेला सेवेतून कायम बडतर्फ करावे असे विशाल सोनवणे यांनी म्हटले आहे.
सदरील शिक्षीकेने उदाहरण देतांना त्या म्हणाल्या की, ममडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकदा असेच ते लॅब्ररीत पुस्तक वाचत बसलेल होते. एका ठिकाणी गोवर्याचा ढिग होता, त्यांनी दिवसभर काहीच खल्लेलं नव्हतं. बाजूला गोवर्याचा ढीग होता, त्यातील एक गोवरी खात खात अभ्यास केला. त्यांच्या ते लक्षात आलं नाही की, आपण काय खायलो, आपल्या शरीरात काय आहे, अन्न आहे की नाही.फफ असे तथ्यहीन उदाहरण विद्यार्थ्यांना देऊन खोटा इतिहास विद्यार्थ्यापुढे मांडून नवीन पिडीला चुकीचा संदेश देण्याचा पयत्न सदरील शिक्षीकेले केलाय तसेच त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोवर्या खावून अभ्यास केल्याचे उदाहरण देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अवमान केल्याचे विशाल सोनवणे यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना खोटा आणि दिशाभुल करणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार्या व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या शिक्षीका चित्रा वसंतराव सारणीकर यांना शिक्षकी पेशातून बडतर्फ करावे, त्या जर सेवेत कायम राहील्या तर विद्यार्थ्यांच्या मनावर खोटा इतिहास कोरला जाईल. त्यामुळे समाजा-समाजात संभ्रम निर्माण होईल. भविष्यात हे वादग्रस्त ठरू शकते. त्यामुळे खोटा इतिहास सांगून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्या शिक्षीका चित्रा वसंतराव सारणीकर या शिक्षीका म्हणून काम करण्यासाठी लायकीच्या नाहीत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे. तसेच त्यांनी समाज माध्यमातून जाहिर माफी मागावी. अन्यथा दोन दिवसात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय.