जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या हॉटेल आदर्श पॅलेस येथे वाढदिवसाची पार्टी सुरु असतांना मित्र-मित्रात झालेल्या वादातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना दि. 3 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान खून झाल्याची माहिती मिळताख चंदनझीरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मित्राचा वाढदिवस असल्याने बदनापूर तालुक्यातील बदापूर येथील नवनाथ गोपीचंद कुलभैये हा 26 वर्षीय तरुण छत्रपती संभाजीनगर रोडवर हॉटेल आदर्श पॅलेस येथे मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता.
यावेळी मित्राचा वाढदिसाची पार्टी सुरु असतांना झालेल्या किरकोळ वादातून एकाने दुसर्याच्या डोक्यावर दारुची बॉटल फोडली. त्याचा राग आल्याने अरुण श्रीसुंदर याने नवनाथ कुलभैये याच्या पोटात चाकू खूपसून रक्तबंबाळ केलं. दरम्यान जखमी नवनाथला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केलं. नवनाथ आणि अरुण हे दोघेही एकाच ट्रान्सपोर्टमध्ये कामाला होते अशी माहिती मिळत आहे. परंतु, काही दिवसापुर्वीच नवनाथला कामावरुन काढून टाकले होते. असेही समजते. या घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संम्राटसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पोहार, शिंदे, पाटील, सानप, कांबळे, एएसआय गवई, पो.हे.कॉ. वाघ, देशमुख, हिवाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील पोलिसांनी एकाला पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. सदरील मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सामान्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलाय. किरकोळ कारणावरुन खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.