जालना तालुक्यातील सोनदेव येथे दि. 5 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास एकादशीच्या फराळातून विषबाधा धाल्याची घटना घडली. यात सुमारे 250 लोकांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर गावातच उपचार करण्यात आले. आज दि. 6 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वावर उपचार करुन सुट्टी देण्यात आली असून सध्या 50 जनावर उपचार सुरु आहेत. त्यातील काही रुग्णांना सेवली तर काही रुग्णांना नेरच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय.
जालना तालुक्यातील सोनदेव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून काल एकादशीच्या दिवशी सर्वांसाठी भगरीचे फराळ करण्यात आले होते. रात्री 7 वाजेच्या सुमारास सर्वांनी फराळ केलं आणि किर्तनाला बसले. किर्तन संपत आलं आणि भक्तांना चक्कर, उलट्या, मळ-मळ, ढाळ सुरु झाले. त्यानंतर काही वेळेतच सुमारे 250 जनांना हा त्रास जाणवू लागल्याने भगरीच्या फराळातून विषबाधा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे गावातील काही नागरीकांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोनवरुन माहिती देण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या यंत्रणेने तात्कळ दखल घेत गावातच उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. 250 पैकी 200 रुग्णावर उपचार करुन त्यांना सुट्टी देण्यात आली असून सध्या 50 रुग्णावर उपचार सुरु आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून सर्व रुग्ण स्थिर असल्याची माहिती गावातील नागरीकांनी दिलीय.