जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्यांच्या ऑपरेशनचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या मुक्ताबाई साळुंके वय 65 रा. आवा अंतरवाला, ता. अंबड, जि. जालना यांचा ऑपरेशनला घेऊन जातांना मृत्यु झाला. ही घटना दि. 29 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली.
आज होणार्या शिबीरामध्ये डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी 25 महिला रुग्णालयात अॅडमिट झाल्या होत्या. त्यात मुक्ताबाई साळुंके या देखील दि. 28 डिसेंबर रोजी रुग्णालयात उपचारासाठी अॅडमीट झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यावर आज ऑपरेशन करण्यात येणार होते. परंतु, ऑपरेशन थेटरमध्ये जाण्यापुर्वी त्यांना भुलीचे इंजेक्शन दिले. त्यानंतर महिलेने मान टाकली असल्याचे नातेवाईकांनी म्हटले. परंतु, सदरील महिलेला कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन दिले नाही, तीला ऑपरेशनसाठी नेन्या आधिच हर्ट अटॅक आला असल्याने तीला उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलिवले. आणि इथे तिचा मृत्यु झाल्या असे उपस्थित डॉक्टरांनी सांगीतले. सदरील महिलेच्या संदर्भात डॉक्टरांना विचारले असता महिला ही मयत झाली आहे. परंतु, आयएमओ शिवाय मयत घोषीत करता येणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. आयएमओ येईपर्यत मयत महिलेवर उपचार सुरुच होते. तोपर्यंत मयत महिलेच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना कळविले नव्हते. आयएमओ आल्यानंतर तपासणी करुन महिलेला मयत घोषीत केले व उपचार बंद करुन महिलेला लावलेल्या व्हेंटीलेटर मशिन देखील काढून घेण्यात आल्या. व नातेवाईकांना पेशंट मयत झाल्याचे सांगण्यात आले. मयत महिलेचे पीएम करण्यात येणार असल्याचे डॉ. परितकर यांनी सांगीतले.
हिरकणी न्यूज ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.wHirkaniNews_16409978
आपणही पुढील मेलवर बातम्या पाठवू शकता
Mob. No. : 9850516724
मेल : hirkaninews@gmail.com