बेकायदेशीर अतिक्रमण काढून टाकल्या प्रकरणी जालना नगर पालिका प्रशासनाचे लोकशाही मार्गाने नामोहरम करुन यश संपादन करण्यात जालना येथील रमेश चौधरी यशस्वी ठरले आहेत. त्यांनी गेल्या अनेक महिन्यापासून जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. त्यांना पोलीस प्रशासनाने अनेकवेळा प्रतिबंधीत केले, जेल मध्ये टाकले, आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न झाला तरी देखील त्यांनी हार माणली नाही. तुरुगात टाकल्यानंतर देखील त्यांनी उपोषणाचे शस्त्र कायम उपसून ठेवले होते.
प्रशासन लक्ष देत नसल्याने लक्ष वेधण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. शिवाय एक वेळ त्यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न देखील केला. आजपर्यंतच्या इतिहासात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अग्रीशामक दलाची गाडी कोणत्याही आंदोलनकर्त्यासाठी आली नाही. परंतु, रमेश चौधरी यांच्या धाकाने तब्बल तिन वेळा अग्रीशामक दलाची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येवून थांबलेली पहायला मिळाली. तर डीएसबीचे एएसआय सय्यद शौकत हे देखील त्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र उपोषणस्थळी धाव घ्यायचे. त्यांनी पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्यात वेळोवेळी समन्वय साधून उपोषणकर्त्याचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
जालना नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रमेश चौधरी यांनी पुन्हा दि. 3 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता समाज कल्याण विभागाच्या संरक्षण भिंतीवर चढून अंगावर पेट्रोल टाकून आत्मदह करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. त्यांनी 6 वाजेपर्यंत आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. परंतु, त्यापुर्वीच पालिका प्रशासनाच्या अधिकार्यांनी आंदोलकाच्या मागण्या पुर्ण करुन त्यांचे संसारोपयोगी साहित्य त्यांच्या स्वाधीन केले. आंदोलन कसे असते, अहिंसेच्या मार्गाने न्याय कसा मिळविता येतो? संघर्ष म्हणजे नेमकं काय असते हे रमेश चौधरी यांच्याकडे पाहिल्यावर कळते. त्यांना त्यांचा मुलगा गोपाल तर साथ देतच होता, मुलाने वडीलाच्या हिंम्मतीला प्रोत्साहन दिले. शिवाय रमेश चौधरी यांची नात देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून उपोषणाच्या ठिकाणी बसायची. त्यांच्या सोबत सकाळ संध्याकाळ वैष्णवीने आजोबाची साथ सोडली नाही.
जालना नगर पलिकेने कोणतीही नोटीस न देता अतिक्रमण पाडण्याच्या नावाखाली रमेश चौधरी यांचे घर पाडून त्यांचे संसारोपयोगी साहित्य नेले होते. सदरील साहित्य परत मिळावे यासाठी रमेश चौधरी यांनी वारंवार विनंती करुनही त्यांना ते परत करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्याक दिवसापासून उपोषण सुरु केले होते.
अखेर रमेश चौधरी यांनी जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे नामोहरम करुन आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून घेतला असून एक मोठ्ठे यश त्यांनी मिळविले आहे. शेवटी त्यांच्या चेहर्यावरील हसू आणि त्यांची हिंमत पाहुन एक प्रश्न विचारला… आता काय वाटतं? त्यांनी हसत मुखाने उत्तर दिले. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे मला न्याय मिळविता आला, त्यांच्यामुळेच मला माझा हक्क मागता आला…
खुप छान