जालन्यात जन आक्रोश मोर्चामध्ये गर्दीचा फायदा घेत चोरांनी धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळालं. काही मोर्चेकरांचे मोबाईल तर काहींचे पैसे चोरीला गेल्याच्या तक्रारी मोर्चेकरांनी केल्यात. आतापर्यंत 12 ते 15 मोर्चेकर्यांनी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या असल्याची माहिती शनिवार दि. 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलिस सुत्रांनी दिलीय.
जालना शहरामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज स्मारक ते अंबड चौफुली पर्यंत जन आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या मोर्चामध्ये मोर्चेकरांचे पैसे तर काहींचे मोबाईल चोरीला गेल्याच समोर आल आहे. आतापर्यंत बारा ते पंधरा मोर्चेकरांनी जालन्यातील कदीम पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दिल्या आहेत.