मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी शासकिय निरीक्षण बालगृह जालना येथे मुलांना भेटुन त्यांच्याशी संवाद साधत त्यांना मायेची थाप दिली. तसेच त्यांना जिल्हाधिकारी किंवा मोठे अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहीत केले व आयुष्यात लक्ष ठेवणे गरजेचे असल्याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले.
धक्कादायक… ! बापाने मुलीला फाशी देऊन टाकले जाळून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल https://t.co/BgzgAw93H8
— Hirkani News (@hirkaninews) December 14, 2022
यावेळी वर्षा मिना यांना रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे मानद सदस्य पद सुद्धा देण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनचे अध्यक्ष धवल मिश्रीकोटकर, सचिव सागर दक्षिणी, अॅड. महेश धनावत तथा बाल न्याय मंडळ सदस्य अॅड. अश्विनी धन्नावत, श्री रामदास जगताप, निरीक्षण गृहाचे अधिक्षक अमोल राठोड, निरीक्षण गृहाचे शिक्षक श्री राठोड, ई. उपस्थित होते.
यावेळी मुलांना रो. गोविंद गोयल, रो. गोपाल गोयल यांच्याकडून संदुक (अल्युमिनीयम पेटी) चे वाटप करण्यात आले. तसेच भविष्यात रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊन यांच्याकडून सुद्धा वेळोवळी मुलांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन रो. धवल मिश्रीकोटकर यांनी दिले.
महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाला सहकार्य करून जनजागृती करण्यासाठी